‘या’ कारणामुळे केरळमध्येही ‘महामेट्रो’ ठरली बेस्ट!

नागपूर :- केरळमधील कोची (Kochi, Kerala) येथे आयोजित पंधराव्या अर्बन मोबिलीटी इंडिया राष्ट्रीय परिषदेत सर्वोत्कृष्ट प्रदर्शक गटात महामेट्रोने (MahaMetro) दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. ‘मेक इन इंडिया’ (Make In India) ही थीम, अल्युमिनियम बॉडी कोच, नागपूर आणि पुणे येथे मालमत्ता विकास, आर्थिक शाश्वतता, पावसाचे पाणी साठवणे यासाठी महामेट्रोला पुरस्कृत करण्यात आले आहे.

पुरस्कार सोहळ्यात महामेट्रोतर्फे संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) अनिल कोकाटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कोची येथे तीन दिवसीय अर्बन मोबिलिटी राष्ट्रीय परिषदेच्या शेवटच्या दिवशी पुरस्कार वितरण करण्यात आले. महामेट्रोने येथे स्टॉल लावला होता. ‘मेक इन इंडिया’ ही थीम असलेल्या या स्टॉलमधून अल्युमिनियम बॉडी कोचची माहिती, नागपूर आणि पुणे येथे मालमत्ता विकास, आर्थिक शाश्वतता, पावसाचे पाणी साठवणे याबाबत माहिती देण्यात आली होती.

मेट्रो प्रकल्पाची गरज समजावून सांगण्यासाठी मेट्रो संवाद, नियो मेट्रो प्रकल्प, तसेच महामेट्रोने आजवर मिळवलेल्या विविध पुरस्काराचे छायाचित्रेही प्रदर्शित करण्यात आली होती. परिषदेच्या तीनही दिवस या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळाला. यापूर्वीही मेट्रोला विविध पुरस्कार मिळाले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रेत अडीच वर्ष भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशांचा वापर

Wed Nov 9 , 2022
– मविआ काळात भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशांचा वापर भारत जोडो यात्रेत करण्यात येत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. नागपुर :- काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात सुरू झालेली ‘भारत जोडो'(Bharat Jodo) यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर आता भाजपकडून टीकेचा बाण सोडण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्या या ‘भारत जोडो’ यात्रेत मागील अडीच वर्षातील सत्ताकाळात केलेल्या भ्रष्टाचाराचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!