नागपुर – राज्यसभेतील सदस्य पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी संसद भवनातील कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या पत्नी डॉ सुनिता महात्मे उपस्थित होत्या. त्यांनी मोदी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती भेट दिली.यावेळी भटके आणि विमुक्त जातीतील लोकांच्या प्रश्न बाबतही चर्चा केली. गुजरातचे मुख्यमंत्री असताना आपण भटक्या आणि विमुक्त जातीतील लोकांना घरे दिली होती तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली होती याची आठवण मोदी यांनी यावेळी करून दिली माझ्या या कार्यावर खुश त्या लोकांनी तिथे माझे मंदिर उभारले. एवढेच नाही तर या मंदिरात माझी मूर्ती ही ठेवली होती मात्र मी त्या मंदिरातील माझी मूर्ती हटवून तेथे भगवंताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली अशी आठवण मोदी यांनी यावेळी सांगितली.
डॉ.विकास महात्मे यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com