कामठी तालुक्यातील 58 हजार 584 कुटुंबाचे सर्वेक्षण

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने शासकीय आदेशानुसार कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात शुक्रवार 2 फेब्रुवारी पर्यंत सर्वेक्षण करण्यात आले ज्यामध्ये कामठी तालुक्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचे सर्वेक्षण करीत नागरिकांचे जातिनिहाय सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार कामठी तालुक्यातील एकूण 58 हजार 584 कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले.

कामठी तालुक्यात एकूण 78 गावे येत असून तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या नेतृत्वात 2 फेब्रुवारी पर्यंत करण्यात आलेल्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षणासाठी राबविलेल्या शासकीय यंत्रणेत एकूण 664 प्रगणक व 58 पर्यवेक्षकांनी सहभाग घेतला होता.या सर्वेक्षणात मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांची संख्या ही 4 हजार 818 असून इतर प्रवर्गातील कुटुंब संख्या ही 53 हजार 766 आहे यानुसार एकुण 58 हजार 584 कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडल संघाची दमदार कामगिरी 

Mon Feb 5 , 2024
– 7 सुवर्णपदक आणि 8 रोप्य पदकासह तिस-या स्थानी नागपूर :- महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडलाच्या संघाने दमदार कामगिरी करीत 7 सुवर्णपदक आणि 8 रोप्य पदक पटकाविले. या स्पर्धेत सर्वाधिक पदके मिळविणाऱ्या पुणे-बारामती परिमंडलाच्या संघास सर्वसाधारण विजेतेपद देण्यात आले. कोल्हापूर परिमंडलास उपविजेतेपद देण्यात आले तर गुणतालीकेत नागपूर- चंद्रपूर- गोंदीया परिमंडलाचा संघ तिस-या क्रमांकावर राहिला. महावितरणचे संचालक (मानव संसाधन) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com