सेंट्रल माईन प्लॅनिंग अँड डिझाईन इन्स्टिट्यूट लिमिटेड- सीएमपीडीआयच्या क्षेत्रीय कार्यालय नागपूर द्वारे दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक उपकरणाचे निशुल्क वितरण गडकरींच्या हस्ते संपन्न
नागपूर :- समाजातील शोषित वंचित दिव्यांगांची सेवा करणे हीच ईश्वर सेवा आहे. या समाज घटकांना प्रमुख प्रवाहात आणण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक , महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये केले. सेंट्रल माईन प्लॅनिंग अँड डिझाईन इन्स्टिट्यूट लिमिटेड- सीएमपीडीआय- या केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या अधीन असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाद्वारे आज नागपुरातील जरीपटका येथे दिव्यांग जणांना सहायक उपकरण वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संबोधित करताना गडकरी बोलत होते. या प्रसंगी सीएमपीडीआयचे क्षेत्रीय संचालक मनोज कुमार, भारतीय कृत्रिम अंग निर्माण महामंडळ -अम्लिकोचे क्षेत्रीय प्रमुख सेनगुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते.
दिव्यांग सहायता शिबिराच्या माध्यमातून आतापर्यंत आपण 40 हजार दिव्यांगांना 40 कोटीचे साहित्य आतापर्यंत वितरित केले असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. सीएमपीडीआयतर्फे कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत 240 दिव्यांगाना या सहाय्यक उपकरण वितरणाच्या माध्यमातून एक नवीन जीवन प्रदान केले जात असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केले .
आपल्या देशात कोळसा आयात केला जातो. याकरिता विदर्भातील कोल इंडियाचे, वेस्टर्न कोल्ड लिमिटेड चे कोळसा उत्पादन वाढावे. अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली मध्ये .कोल बेड मिथेनचे साठे चंद्रपूरच्या भद्रावतीमध्ये असून या कोल बेड मिथेनच्या सीएनजी मध्ये रूपांतर करण्याची क्षमता असल्याचेही त्यांनी सांगितलं.
याप्रसंगी दिव्यांग जणांना व्हील चेअर, हीएरिंग ऐडस , चष्मे तसेच विविध सहाय्यक उपकरणे गडकरींच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव , सीएमपीडीआयचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.