प्रेयसीने केला प्रियकराचा गुप्तांग ठेचून खून?

– साखरपुड्यासाठी हवे होते पैसे

– दुपारी फोन करणारा तो व्यक्ती कोण? 

नागपूर :- हुडकेश्वरमधील एका भूखंड विकासक असलेल्या व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावर आढळून आल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद केली. मात्र, त्या व्यक्तीचे गुप्तांग ठेचून खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्या व्यक्तीच्या प्रेयसीनेच काही साथिदारांच्या मदतीने खून केल्याची चर्चा जोरात आहे. रवी (५२) हुडकेश्वर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री नऊ वाजता उदयनगर, तपस्या विद्यालयाजवळ रस्त्याच्या कडेला रवी यांचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी कुटुंबीयांना फोनवरुन माहिती दिली. त्यानंतर मृतदेह मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आला. येथे शनिवारी शवविच्छेदनानंतर प्राथमिक अहवालात गुप्तांगाला मार बसल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे वर्धा येथील रवी पंडित कुडवे हे कामानिमित्त नागपुरात स्थायिक झाले होते. येथे टेलरींगचे काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. गेल्यावर्षी रवी यांच्या पत्नीचे निधन झाले. रवी यांनी २०१४ पासून टेलरींगचा व्यवसाय सोडून ‘प्रापर्टी दलाल’ म्हणून एका विकासकाकडे काम सुरु केले. तर काही वर्षापासून त्यांनी स्वत:चा व्यवसाय थाटला होता. भूखंड व्यवसायातून त्यांची एका विधवा महिलेशी ओळख झाली. तिच्याशी मैत्री झाली. तिला २७ वर्षीय मुलगी आहे. दरम्यानच्या काळात व्यवसायाचा संपूर्ण मालकी हक्क रवीने आपल्या कडे घेतला होता. तो महिलेच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होता. महिलेवर असलेले बँकेचे कर्जही फेडण्यातही मदत केली होती. या महिलेच्या मुलीचे रविवारी साक्षगंध होते. याकरिता क्रेडीट कार्डवर खरेदी केलेले साहित्याच्या ४ ते ५ लाख रुपयासाठी भागीदार महिलेसह तिच्या कुटुंबीयांनी रविंद्रकडे तगादा लावलयाचे सांगितले जाते. मात्र काही दिवसांपासून रवी यांनी महिलेसह तिच्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यात चांगलेच खटके उडायला लागले.

शुक्रवारी सकाळी ७.३० च्या सुमारास रवी हे तुकडोजी चौकात एकाला भेटायला गेले होते. मात्र, त्यांचा रात्री रस्त्याच्या कडेला मृतदेहच आढळला. हुडकेश्वर पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद करीत तपास सुरु केला आहे.

आई व मुलीशी अनैतिक संबंध

रवीने विधवा महिलेशी मैत्री केल्यानंतर तिच्याशी अनैतिक संबंध ठेवले. त्यानंतर प्रेयसीच्या २७ वर्षीय मुलीवर त्याची नजर गेली. त्याने तिलाही प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यावर लाखो रुपये तो उधळायला लागला होता. तिचे गेल्या रविवारी साक्षगंध होते. त्यासाठी तिने रवी यांना पैशाची मागणी केली होती. मात्र, रवीने पैशाची पूर्तता न केल्यामुळेच शनिवारी त्याचा गुप्तांग ठेचून खून केला असावा, अशी चर्चा आहे.

पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरु आहे. तपासात काही तथ्य आढळ्यास गुन्ह्यात कलमवाढ करण्यात येईल. प्राथमिकदृष्ट्या हा हत्याकांडाचा प्रकार वाटत नाही. या प्रकरणात रवीशी मैत्री असलेल्या एका महिलेची आणि तिच्या २७ वर्षीय मुलीची चौकशी करण्यात येणार आहे. तपासाअंती सर्व काही समोर येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वारेगाव येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी 

Wed Apr 24 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- वारेगाव येथे जय हनुमान मंदिरात दही काला व महाप्रसादाने हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली हनुमान मंदिरात ह भ प अजाबराव उईके महाराज यांचे हस्ते पालखी तील हनुमानाच्या मूर्तीची पूजा आरती करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली जय हनुमान भजन मंडळ, संत गोरोबाकाका महिला भजन मंडळ, श्री साईबाबा महिला भजन मंडळ वारेगाव यांच्या प्रमुख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com