वारेगाव येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- वारेगाव येथे जय हनुमान मंदिरात दही काला व महाप्रसादाने हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली हनुमान मंदिरात ह भ प अजाबराव उईके महाराज यांचे हस्ते पालखी तील हनुमानाच्या मूर्तीची पूजा आरती करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली जय हनुमान भजन मंडळ, संत गोरोबाकाका महिला भजन मंडळ, श्री साईबाबा महिला भजन मंडळ वारेगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखीला सुरुवात करण्यात आली गावातून विविध मार्गाने पालखी नगर भ्रमह्मण करीत हनुमान मंदिरात समापन करण्यात आले पालखीचे ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत करून प्रसादाचे वितरण केले हनुमान मंदिरात ह भ प अजबराव उईके महाराज यांचे हस्ते दहीहंडी फोडून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली महाप्रसाद कार्यक्रमाला कामठी पंचायत समितीच्या सभापती दिशा चनकापुरे, सरपंच रत्ना उईके, उपसरपंच कमलाकर बांगरे, माजी सरपंच प्रतिभा चिखले, राजेश मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य शेवंता रामटेके ,शांता मेश्राम ,मंगला युवनाते, राम युवनाते, किसनलाल चौधरी ,रामू धुर्वे ,रामराव बोंद्रे ,गोपी बोलकी, सुनील चांदुरकर, विष्णू लेकुरवाळे, वसंता गुंडाळे ,नीतू उईके सह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मतदार जागरूकतेसाठी प्रशिक्षण शिबिरांना मार्गदर्शन

Wed Apr 24 , 2024
मुंबई :- मुंबई शहर जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने जनजागृतीसाठी स्वीप (SVEEP) अर्थात मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत नुकतेच भायखळा विधानसभा मतदार संघात दोन प्रशिक्षण शिबिर घेण्यात आली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार भायखळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या शिक्षकांसाठी आयोजित शिबिरात बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com