घरफोडी करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

पोलीस स्टेशन काटोल :- अंतर्गत सुशिला पुरम सावरगाव रोड काटोल ०१ कि मी उत्तर यातील अज्ञात आरोपीने फिर्यादीचे घराचे दरवाजाचे लॉक तोडुन बेडरूम मधील आलमारीचे लॉकर उघडुन त्यातील ११ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ कि. ३०,०००/- रू., सोन्याची अंगठी वजन ०५ ग्रॅम कि. १२,०००/- रू., पर्स मधील नगदी ३,००० /- रू असा एकूण ४५,०००/- रू चा माल दिनांक ०३/०६/२३ से २०.३० वा ते २९.३० वा दरम्याण चोरून नेला.

सदर प्रकरणी फिर्यादी नामे अमोल मोहन धापोडकर वय ४१ वर्षे रा. सुशिला पुरम काटोल यांचे रिपोर्टवरून पो. स्टे. काटोल येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ४५७,३८० भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आगासे पो स्टे काटोल  करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज परीसराच्या विस्तारीकरण व सौंदर्याकरणाचे भूमीपूजन संपन्न

Wed Jun 7 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे कामठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवाजी महाराज परीसराचे विस्तारीकरण व सौंदर्यकरण व्हावे याकरीता मागील तीन वर्षे पासुन युवा चेतना मंच कामठी तर्फे सतत पाठपुरावा करण्यात येते होते , विविध प्रकारचे शासकीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम कार्यालया, अभियंता , राजकीय पदाधिकारी यांच्या पाठपुरावा करून युवा चेतना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com