कळमेश्वर :- अंतर्गत मौजा कळमेश्वर सरदार मोहल्ला व्यायाम शाळेजवळ दिनांक ०४/०६/२०२४ ये सकाळी १०.०० वा. सुमारास फिर्यादी नामे राजेंद्र उर्फ राजा अशोक पुसदकर, वय २५ वर्ष, रा. हुडको कॉलोनी वार्ड क. १४ कळमेश्वर याचे पानठेल्याचे उधारी आरोपी नामे कुलाण दिलीप डांगे, वय २५ वर्ष रा. हुडको कॉलोनी दुर्गा मंदीर जवळ कळमेश्वर याच्या कडे असल्याने दि. ०३/०६/२०२४ चे रात्री ०९/३० वा. सुमारास फिर्यादीला आरोपी दिसल्याने त्यास उधारीचे पैसे मांगितले तेव्हा त्याने फिर्यादी पैसे दिले नाही व तो फिर्यादीला शिवीगाळ करून झगडाभांडन केले. दि. ०४/०६/२०२४ चे सकाळी १०/०० वा. सुमारास फिर्यादी कळमेश्वर सरदार मोहल्ला, व्यायाम शाळे जवळ असतांना पाठीमागुन आरोपीने येवुन आलु शिलाचे चाकुने पाठीवर मानेवर व गळयाचे उजव्या बाजुला व उजव्या कानाजवळ मारून जखमी केले उजवे हाताचे मनगटावर व डावे हाताचे तळहातावर मारून जखमी केले आहे व पुन्हा त्याने शिवीगाळ करून पुन्हा मारण्याची धमकी दिली आहे. आरोपी याने पानठेल्याचे उधारीचे पैसे का मांगितले या कारणावरून शिवीगाळ करून आलु शिलाचे चाकुने जिवानीशी ठार करण्याचे उद्देशाने मारून जखमी केले.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रीपोर्ट वरून पोस्टे कळमेश्वर येथे आरोपीविरूद्ध कलम ३०७, ५०४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा नोंद असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रमीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), मा. अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे कळमेश्वर येथील ठाणेदार पोनि योगेश कामाले, पोउपनि मनोज टिपले, पोहवा गंगाधर ठाकरे, पोशि नुमान शेख यांनी पार पाडली.