कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला उपमुख्यमंत्री मानद सचिव संदीप जोशी यांची भेट

– आंदोलकांशी साधला संवाद : मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यास पुढाकार घेण्याबाबत केले आश्वस्त

नागपूर :- महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती यांच्या राज्यव्यापी सुरु असलेल्या नागपूर येथील अंदोलन स्थळी उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार उपमुख्यंमत्री यांचे मानद सचिव संदीप जोशी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला व त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. याप्रसंगी माजी नगरसेवक  विजय (पिंटू) झलके उपस्थित होते.

एमएसईबी वर्कर्स युनियन (पॉवर फ्रंट)चे सेक्रेटरी जनरल  नचिकेत मोरे, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (बी.एम.एस) चे अध्यक्ष निलेश खरात, विदर्भ जनरल लेबर युनियन ( सीटू)चे अध्यक्ष वामन बुटले, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना अध्यक्ष भाई चैनदास भालाधरे, महाराष्ट्र राज्य विद्युत स्वतंत्र कंत्राटी कामगार संघटना (ILU) चे अध्यक्ष डी. जी. तायडे, रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे अध्यक्ष शंकर गडाख, म.रा. बहुजन कामगार संघटना (प्रकाश आंबेडकर) चे अध्यक्ष सुरेश भगत, तांत्रिक अप्रेंटीस कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे, संघर्ष कंत्राटी कामगार समिती (पारस) अध्यक्ष सतीश तायडे, महाराष्ट्र बाह्यस्त्रोत वीज कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष दिपक ओतारी, विद्युत क्षेत्र तांत्रिक कंत्राटी कामगार युनियनचे अध्यक्ष संजय पडोळे, ऑल इंडिया रोजंदारी कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी वामन मराठे यांच्यासह महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तीनही वीज कंपन्यांमधील शेकडो कंत्राटी वीज कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीद्वारे उपमुख्यत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाद्वारे संघटनेने आपल्या मागण्यांबाबत अवगत केले. महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तीनही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कर्मचा-यांना वेतनवाढ, रोजगारात सुरक्षा, कंत्राटी कागारांना नियमित सेवेत सामावून घेणे, समान कामास समान वेतन, कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी झालेल्या कंत्राटी कर्मचा-यांच्या आर्थिक मदतीत वाढ, अपघात विमा तसेच कुटुंबाकरिता मेडिक्लेम योजना, पारेषण व वितरण भरती प्रक्रियेला स्थगिती देणे, कंत्राटी कामगाराच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसास नियमित कामगार म्हणून सामावून घेणे, नक्षलग्रस्त भागात नक्षलग्रस्त भत्ता देणे अशा विविध मागण्यांबाबत संघटनेच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री मानद सचिव संदीप जोशी यांच्याशी चर्चा केली.

या सर्व मागण्यांवर शासनाद्वारे हितकारक निर्णय घेण्याबाबत शिफारश करण्याची देखील विनंती संघटनेद्वारे करण्यात आली. संदीप जोशी यांनी संघटनेच्या सर्व मागण्या आणि समस्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे ठेवून त्याबाबद्दल सकारात्मक निर्णय घेण्याबाबत आपण स्वत: चर्चा करू, अशी ग्वाही यावेळी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन आज

Fri Mar 8 , 2024
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने “दक्षिण-पश्चिम नागपूर व पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ येथील सिमेंट काँक्रीट रस्ते, सोनेगांव तलावाचे सौंदर्यीकरण व ई-बसेसचे तसेच विविध आयुष्मान आरोग्य मंदिराचे लोकार्पण व भूमिपूजन” शुक्रवार ८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता राजे संभाजी चौक(नागोबा मंदिर चौक) आय.टी. पार्क, मेन रोड येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थिती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com