ग्रामरोजगार सेवकांचे एक दिवसीय लक्षणिक उपोषण

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित न्यायिक मागणीसाठी कामठी तालुका ग्रामरोजगार संघटनेच्या वतीने आज 3 ऑक्टोबर ला एक दिवसीय लक्षणिक उपोषण धरणे आंदोलन पुकारले आहे .याप्रसंगी कामठी तालुका ग्रामरोजगार सेवकांच्या वतीने कामठी पंचायत समिती कार्यालय समोर मोर्चा,निदर्शने व धरणे आंदोलन पुकारण्यात आले असून आंदोलनाला सहभागी कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.

हे एक दिवसीय लक्षणिक उपोषण करण्यात आले त्या मागण्याध्ये 2 मे 2011 चा अर्धवेळ शासन निर्णय पूर्णवेळ करून ग्रामरोजगार सेवकांना शासकीय सेवेत समावेश करावा, ग्रामरोजगार सेवकांना निश्चित मानधन देऊन ते त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे, वयोवृद्ध ग्रामरोजगार सेवकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला पदावर घेण्यात यावे, ग्रामरोजगार सेवकांना विमा कवच लागू करावा, ग्रामरोजगार सेवकांना कामावरून काढण्याचा अधिकार ग्रामसभेला न देता सीईओ ला देण्यात यावे, मजुरांची ऑनलाईन हजेरी घेण्यासाठी रिचार्ज सह मोबाईल देण्यात यावा या मागण्यांचा समावेश आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com