राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे गुरुवारी रात्री १० वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. शुक्रवारी ते जिल्ह्यातील विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
उभय नेते उद्या गडचिरोली व नागपूर येथील विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. उद्या २९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता हेलिकॉप्टरने ते गडचिरोलीकडे प्रयाण करतील. दुपारी ११.४५ वाजता नागपूर येथे त्यांचे आगमन होईल. दुपारी दीड वाजता नागपूर पोलिस भवनाच्या कार्यक्रमात ते उपस्थित राहतील.
सावनेर येथे दुपारी ३.४५ वाजता उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या उपस्थितीत पोलीस स्टेशन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. सायंकाळी पाच वाजता शहरातील विविध विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहे. उद्या रात्री नऊ वाजता ते मुंबई कडे विमानाने प्रयाण करतील.
दरम्यान, आज रात्री दहा वाजता विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यानंतर विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे, नागपूरचे पोलीस आयुक्त अमीतेश कुमार,जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी.,विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, संदीप पाटील,पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी त्यांचे स्वागत केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे नागपूर येथे आगमन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com