नागपूर :- पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीत प्लॉट नं. १०५, प्रणवहीत अपार्टमेंट, पांडे ले-आउट, खामला रोड, नागपूर येथे राहणारे फिर्यादी सुमीत अशोक पोहरकर, वय ३६ वर्ष, हे आपले घराला कुलूप लावुन परिवारासह, बाहेर गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून घरातील बेडरूम मधील लोखंडी आलमारी मधील रोख १,५०,०००/- रू. व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण किंमती अंदाजे १,६६,३००/- रू. या मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे प्रतापनगर येथे सपोनि, तांबे यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून, पुढील तपास करीत आहे.