संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– महावितरण कंपनीने तासोंतास विज बंद असल्याने ग्राहकांना होणा-या त्रासाची भरपाई द्यावी.
कन्हान :- शहरात मागिल एका महिन्या पासुन या कडक उन्हाळयात आणि नवताप्याच्या उष्ण तापमानात ना वादळ, वारा, पाऊस नसताना कन्हान ला दिवसरात्र वारंवार तासोंतास विधृत पुरवठा खंडीत होत असल्याने येथील नागरिकाना भयंकर त्रास सहन करावा लागत असल्याने संताप व्यकत होत आहे. महावितरण विधृत कंपनी जसे विधृत बील भरण्यास विलंब झाल्यास ग्राहकाकडुन दंड वसुल करते. त्याच प्रमाणे विजेच्या लपंडावामुळे तासोंतास विधृत पुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक नागरिकांना होणा-या भयंकर त्रासाची महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कन्हान शहरात जवळपास ५० हजाराच्या जवळ पास लोकसंख्या असुन दाट लोकवस्ती आहे. मे महिना लागल्या पासुन कडक उन्हाळयात कन्हान शहरात विजे लपंडाव सुरू आहे. परंतु (दि.२५) मे पासुन नवतप्याच्या उष्ण तापमानात ना वादळ, वारा, पाऊस नसताना सुध्दा कन्हान ला दिवसरात्र वारंवार तासोंतास विज बंद होत आहे. या आठवडयात दररोज तासोंतास दिवसा व रात्री विधृत पुरवठा खंडित होत असताना छोटया मुलाबाळासह नागरिकांना भयंकर त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिक विधृत पुरवठा केंद्र कन्हानच्या कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी याना फोन किंवा स्वत: संपर्क करतात तेव्हा नागरिकाना योग्य समाधान न करता उलट सुलट उत्तर मिळत असल्याने नागरिका मध्ये रौष व्यापत होऊन संताप उफाळत आहे.
बुधवार (दि.२९) जुन ला रात्री गोविंद जुनघरे याच्या घरा समोर तारसा रोड येथील रोहीत्र हे रसत्यात असुन तेथुन जाणा-या एका ट्रकवरील पाल उडुन ताराना लागल्याने रोहीत्रात बिगाड आल्याने शहरातील विधृत पुरवठा खंडित झाल्याने विधृत कर्मचा-यांनी ते रोहीत्र काढुन दुसरे रोहीत्र लावुन विधृत पुरवठा सुरू करण्यात आला. परत गुरूवार ला सुध्दा रात्रीला त्याच रोहित्रात बिघाड येवुन विधृत पुरवठा खंडीत झाला. तसेच शुक्रवार ला सुध्दा रात्री ११ वाजता त्याच रोहि त्रात बिघाड होऊन शहरातील विधृत पुरवठा खंडीत झाल्याने त्याची दुरूसती करिता उशीरा आलेल्या विज कर्मचा-यावर संताप व्यकत केल्याने वातावरण चांगले च तापल्याने महावितरण उपकेंद्राचे अभियंता भगत व ठाणेदार उमेश पाटीस पोलीस कर्मचा-यासह घटना स्थळी पोहचुन संतप्त नागरिकांना शांत करून रोहित्रा ची दुरूस्ती करून रात्री १.३० वाजता विधृत पुरवठा सुरू केला. परंतु काही नगरातील रोहित्रावरून बिघाड होऊन विधृत पुरवठा खंडीत असल्याने रात्री २.३० वाजे पर्यंत विधृत कर्मचा-यानी नगरानगरात जावुन दुरूस्ती वारंवार करून विधृत पुरवठा सुरू करावा लागल्याने परिसरातील छोट्या छोट्या मुलाबाळासह नागरिकांना या रात्री तासोंतास विधृत पुरवठा खंडीत झाल्याने भयंकर त्रास सहन करावा लागला. या नेहमी च्या वारंवार होत असलेल्या तासोंतास खंडीत विधृत पुरवठया मुळे ग्राहक नागरिकांना महावितरण विधृत पुरवठा कन्हान केंद्राच्या अधिकारी व खाजगी कर्मचा-यावर रौष व्यकत करून ग्राहक नागरिकांकडुन जर एखाद्या वेळेस विधृत बिल भरण्यास एक दिवसही विलंब झाल्यास दंड आकारण्यात येतो किंवा तीन महिन्याच्यावर बिल न भरल्यास विधृत पुरवठा खंडीत करण्यात येतो. त्याच प्रमाणे महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणे, दिरंगाईने विजेच्या लपंडावामुळे तासोंतास विधृत पुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक नागरिकांना होणा-या भयंकर त्रासाची महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी नागरिकात जोर धरू लागली आहे.