– जिल्हाधिकारी ऐकणार गाऱ्हाणी
नागपूर :- जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे 3 ऑक्टोबरला दुपारी 1 ते 2 या वेळेत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी प्राप्त तक्रारी, अडचणी व गाऱ्हाणी ऐकणार आहेत.
लोकशाही दिनासाठी नागरिकांकडून दुपारी 12 वाजेपर्यंत तक्रार व निवेदन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. तक्रार अर्ज दाखल केलेला नागरिकाला व्यक्तीश: लोकशाही दिनात सहभागी व्हावे लागेल.
लोकशाही दिनाच्या तक्रारीचे निकष याप्रमाणे आहेत. तालुकास्तरीय लोकशाही दिनातील तक्रार अर्जावर कारवाई न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार अर्ज सादर करावा. तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांक नमूद करणे अनिवार्य राहील. अर्ज विहित नमुन्यात असावा. तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावा. तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेला अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी तसेच तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर अर्ज स्विकारले जाणार नाहीत.