कन्हान :- २६ नोव्हेंबर संविधान दिना निमित्त रिपब्लि कन सांस्कृतिक संघ कन्हान व्दारे विश्वरत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर चौक कन्हान येथे संविधान दिवस व संविधान जनजागृती कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
मंगळवार दि.२६) नोव्हेंबर ला सकाळी १० वाजता रिपब्लिकन सांस्कृतिक संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. व संघाचे पदाधिकारी व उपस्थित नागरिकानी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन सांस्कृतिक संघा चे अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांनी उपस्थितीना संविधा न दिनविशेषाचे महत्व सांगितले की, २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन याच दिवशी भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदीय विधीमंडळात स्विकारल्या गेली म्हणुनच आज संविधान दिन साजरा करतात. आजच्या या दिनी ज्यांनी संविधान लिहिले त्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधाना बद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आजचा दिवस संविधान दिन म्हणुन साजरा केला जातो असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी मनोज गोंडाने, चेतन मेश्राम, राजेश फुलझेले, शरद मेश्राम, सुशील डोंगरे, आकाश कोटांगडे, महेश चव्हाण, दिवाळु मेश्राम, अभिजीत चांदुरकर सह नागरिक उपस्थित होते. आभार रोहित मानवटकर यांनी व्यकत केले.
मानव अधिकार संरक्षण संघटना व्दारे संविधान दिन साजरा
मानव अधिकार संरक्षण संघटना व्दारे तारसा रोड गहुहिवरा फाटया जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास माल्यार्पण व संविधान प्रास्ताविकाचे वाचन करून संविधान दिन साजरा कर ण्यात आला.
मंगळवार (दि.२६) नोहेंबर २०२४ ला तारसा रोड गहुहिवरा फाटया जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळया जवळ मानव अधिकार संरक्षण संघटना व्दारे डॉ बाबासाहेब आबेंडकर यांच्या पुतळयास मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण व संविधान प्रास्ताविकांचे सामुहिक वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी मानव अधिकार संरक्षण संघटना तालुकाध्यक्ष पंकज रामटेके, प्रमोद चंद्रिकापुरे, संजय गाते, मनिष हुमणे, राजेश अंबागडे, जयेद्र ठाकुर, भगवान ठाकरे, विक्रम सोमकुवर, आकाश कावळे, पिंटु राऊत, अक्षय वासनिक, राजेंद्र नितनवरे सह नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.