वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास २६ दिवसांत नुकसानभरपाई – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर : “कोणत्याही शेतकऱ्याचे वन्य प्राण्यांमुळे नुकसान होऊ नये ही शासनाची भूमिका आहे. असे झाल्यास २६ दिवसांच्या आत नुकसानभरपाई देण्यात येईल”, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देतांना दिली.

कोकणात वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकांच्या होत असलेल्या नासाडीसंदर्भात सदस्य योगेश कदम यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य सर्वश्री नितेश राणे, भास्कर जाधव, बच्चू कडू आदिंनी सहभाग घेतला.

मंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, “कोकणात माकडांची तसेच रानडुकरांची संख्या जास्त आहे. माकडांच्या उपद्रवामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हिमाचल प्रदेश येथे वन्यजीव सुरक्षा अधिनियमानुसार माकडांची नसबंदी करण्यात येऊ शकते. या आधारावर केंद्र शासनाची विशेष अनुमती घेऊन माकडांची नसबंदी करता येईल.

वन विभागाचे अधिकारी आणि कृषी विद्यापिठाचे अधिकारी यांच्या सहकार्याने नुकसानीची मोजणी केली जाईल. तसेच वन विभागात तीन हजार पद भरती केली जाईल”, असे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चितार ओळी मेट्रो स्टेशन पासून इतवारी, महाल बाजरपेठ मध्ये पोहोचणे झाले शक्य

Wed Dec 28 , 2022
नागपूर :- महामेट्रोने नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊनच मेट्रो स्टेशन उभारले आहे. शहरातील अतिशय व्यस्त आणि गर्दीचे ठिकाण म्हणजे सीए रोड या ठिकाणी शहरातील इतर भागातील लोक या ठिकाणच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात येत असतात. या ठिकाणी धान्य, कपडे,ज्वेलरीची मोठी बाजारपेठ असल्याने तसेच या परिसरात आता मेट्रो सेवा सुरु झाल्याने मेट्रोने नागरिकांची वर्दळ वाढली आहे. नागरिक आता मेट्रो प्रवासाला प्राधान्य देत आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com