नवी दिल्ली :- नवी दिल्लीतील प्रधानमंत्री संग्रहालयाला देशातील प्रत्येक नागरिकाने भेट द्यावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
माजी पंतप्रधान दिवंगत, चंद्रशेखर यांचे पुत्र नीरज शेखर यांनी प्रधानमंत्री संग्रहालयाच्या भेटीबद्दल केलेल्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधान म्हणाले;
“चंद्रशेखर यांच्या सारख्या महान व्यक्तिमत्वाचा सहवास लाभला आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले हे माझे सौभाग्य आहे. प्रधानमंत्री संग्रहालयात चंद्रशेखर यांच्यासह आपल्या सर्वच पंतप्रधानांचे योगदान देशवासीय जाणून घेऊ शकतील. मी आग्रह करेन की प्रत्येकाने येथे नक्की यावे. ”