संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त कामठी तालुक्यातील विविध शासकीय ,निमशासकीय कार्यालयासह ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.त्यानुसार नविन कामठी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी दुय्यम पोलीस निरीक्षक, जीवन भातकुले यासह पोलीस स्टेशन चे समस्त अधीकारी कर्मचारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते तर जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसगी पोलीस स्टेशनचे समस्त अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते
कामठी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सभापती दिशा चनकापुरे,उपसभापती दिलीप वंजारी यासह पंचायत समिती सदस्यगण व कार्यालयीन अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कामठी नगर परिषद कार्यालयात प्रशासक व मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी कार्यालयीन समस्त अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.शासकीय उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षिका नैना धुमाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कामठी तहसील कार्यालयात तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी पोलीस अधिकारी व सहकारी पथकच्या वतीने तिरंगी झेंड्याला सलामी देण्यात आली.याप्रसंगी नायब तहसीलदार,कार्यालयीन अधिकारी कर्मचारी सह लोकप्रतिनिधी व गनमान्य नागरिक उपस्थित होते.तसेच कामठी बस स्टँड चौकात पटेल न्यूज पेपर एजन्सी कार्यालयात कामठी नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष शकुर नागाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष नीरज यादव,माजी नगराध्यक्ष गुड्डू मानवटकर, प्रमोद गेडाम, माजी नगरसेवक विकास रंगारी, रितेश यादव,अभय गेडाम,जेटली,कृष्णा यादव, तहसीन अख्तर,माजी सरपंच इंदलसिंग यादव , कृष्णा पटेल, हुसेन अली तय्यब अली,,नसीम भाई,सलमान अब्बास, सलीम भाई,राजेश काटरपवार,गजेश यादव,विलास बांगरे,विजय जैस्वाल,राजेश गजभिये,आनंद गेडाम, सुनील चहांदे, राकेश कनोजिया,अविनाश भांगे,प्रमोद खोब्रागडे,कोमल लेंढारे, सुनील बडोले, आशिष मेश्राम,गीतेश सुखदेवें,राजन मेश्राम, मनोज रंगारी ,आदी उपस्थित होते.तसेच कामठी रेल्वे स्टेशन मार्गावर स्व.सरजूप्रसाद दुबे जन कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था च्या वतीने सुद्धा ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी संस्था संचालक नितु दुबे,प्राजक्ता वासनिक आदी उपस्थित होते.