नागपूर :- मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (ता:१०) मनपा हद्दीतील चिंचभवन डीपी मार्गाची पाहणी केली. चिंचभवन डीपी मार्ग मनीषनगरशी जोडल्या जाणार असून, परिसराचा विकास होण्यास मदत मिळणार आहे. तसेच विमानतळ जवळ असल्याने नागरिकांना याचा लाभ होणार आहे.
याप्रसंगी नगररचना सह संचालक ऋतुराज जाधव, उपअभियंता राजीव गौतम, अनिल गेडाम त्यांच्यासह नगर रचना विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्वप्रथम नागपूर महानगरपालिका हद्दीतील चिंचभवनकडून शंकरपुर कडे जाणाऱ्या चिंचभवन डीपी विकास मार्गाची पाहणी केली. त्यानतंर त्यांनी विकास मार्गासाठी लागणाऱ्या प्रशासकिय कार्यवाही पूर्ण करुन प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.