ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, सिरोंचातील मतदान केंद्रावर गोंधळ; अहेरीवरून हेलिकॉप्टरने अर्ध्या तासात…

गडचिरोली :- मतदान सुरू असताना तीन ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने तेलंगणा सीमेवर शेवटच्या टोकावरील सिरोंचातील मतदान केंद्रात गोंधळ उडाला होता. अखेर अहेरीवरुन तातडीने हेलिकॉप्टरने नवीन तीन ईव्हीएम पोहोचविण्यात आल्याने प्रक्रिया सुरळीत सुरु झाली.

गडचिरोली पोलीस दलाकडे दोन हेलिकॉप्टर उपलब्ध आहेत. मात्र, निवडणूक काळात सुरक्षेच्या दृष्टीने दुर्गम, अतिदुर्गम भागात मतदान पथके, ईव्हीएम व इतर साहित्य पोहोचविण्यासाठी आणखी सात हेलिकॉप्टर सज्ज आहेत. एकूण ९ हेलिकॉप्टरद्वारे मतदान अधिकारी व ईव्हीएम पोहोचविण्यात आले आहेत. दरम्यान, ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाल्यास नक्षलप्रभावित व संवेदनशील भागात नवीन ईव्हीएम पोहोचविण्यासाठी अहेरी येथे पोलिस दलाने हेलिकॉप्टर सज्ज ठेवले होते. दरम्यान १९ एप्रिलला सकाळी नऊ वाजता सिरोंचात तीन मतदान केंद्रांवरील ईव्हीएममध्ये बिघाड झाला. त्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला.

अखेर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदित्य जीवने यांनी वरिष्ठांनी संपर्क केला. त्यानंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अहेरी येथून राखीव म्हणून ठेवलेल्या ईव्हीएममधून तीन ईव्हीएम हेलिकॉप्टरने पाठवून दिले. त्यामुळे प्रक्रिया पूर्ववत सुरु झाली. सुरक्षेच्या कारणास्तव संवेदनशील भागात यंत्रणेकडून यावेळी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येत आहे. सोबतच ‘एअर ऍम्ब्युलन्स’ देखील सज्ज ठेवण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पश्चिम बंगालमध्ये टीएमसी अन् भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानावेळी राडा; एकजण गंभीर जखमी

Fri Apr 19 , 2024
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज (१९ एप्रिल) पार पडत आहे. देशातील जवळपास १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मतदारसंघांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. असे असतानाही पश्चिम बंगालमधील कूच बिहारमध्ये मतदानादरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com