दगडी कोळसा चोरणाऱ्या आरोपींना अटक, एकुण २१,२६,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त

नागपूर :-दिनांक १९.०३.२०२४ चे १२.४५ वा. ते १४.५० वा. चे दरम्यान, गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे पारडी हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून, पो. ठाणे पारडी ह‌द्दीत, गोयल यांचे न्यू उमीया इंडस्ट्रीज, कापसी बुजूर्ग, येथे रेड कारवाई केली असता आरोपी नामे चेतन मधुकर मेश्राम, वय ४७ वर्ष, रा. पलॉट नं. २४, नाका नं. ६, कळमणा रोड, नागपूर २) कलीराम मणीराम जबिकर,वय ४५ वर्ष, रा. तलई कॅप, धारनी, जि. अमरावती ३) मोहम्मद गुलाम नची वल्द याकुब मुल्ला, वय ४२ वर्षे, रा. आजरी माजरी भिलगाव रोड, दिवान ले-आउट, मळमणा नागपूर यांनी आपले आर्थिक फायदयाकरीता संगणमत करून दगडी कोळसा चोरी करून तो दगडी कोळसा नमुद ठिकाणी गोळा करून टुक मध्ये भरून विक्री करण्याचे उद्देशाने समक्ष मिळुन आल्याने त्यांचे कडुन ट्रक क. एम. एच. २७ बी.एक्स ८५१६ व सोबत २३ उन दगडी कोळसा असा एकुण २१,२६,०००/- रू. चा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करून आरोपीविरूध्द कलम ३७९, ३४ भा.दं.वी अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पोनि राहुल शिरे, पोउपनि राहुल रोटे, पोहवा. रामचंद्र कारेमोरे, टप्पूलाल चुटे, राजुसिंग राठोड, नापोअं, अमोल भक्ते पोअं. विशाल नागभिडे, योगेश महाजन यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिलाएं अर्थव्यवस्था की मध्य धार से जुड़े - बी सी भरतीया

Thu Mar 21 , 2024
नागपूर :- हमारे देश को विश्व की बड़ी शक्ति बनाने के लिए जरूरी है कि सभी देशवासियों का प्रत्यक्ष रूप से अर्थव्यवस्था में योगदान देना जरूरी है। महिलाएं हर दृष्टि से संपन्न है। पढ़ी लखी है। सब कामकाज कर सकती है। जरूरी है की घर गृहस्थी की जवाबदारी निभाते हुए, उन्हें समय में से समय निकलना होगा और अर्थव्यवस्था में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com