स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.29) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 2 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत झेंडा चौक, महाल येथील श्रीनाथ किराणा स्टोअर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत खरे टाऊन येथील होमियोपॅथी क्लीनीक यांच्याविरुध्द रस्त्यालगत क्लिनीकचा कचरा सामान्य कच-यासोबत पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.गांधीबाग झोन अंतर्गत हंसापूरी, बजेरिया येथील जय माता दी फुटाणा शॉप यांच्याविरुध्द दुकानाचे साहित्य ठेवून रस्त्यालगत अतिक्रमण केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत टी.बी.टाऊन, भंडारा रोड येथील श्री सदगुरु पॅथॉलॉजी यांच्याविरुध्द जैव-वैद्यकीय कचरा सामान्य कच-यासोबत पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आशीनगर झोन अंतर्गत प्लॉट नं. 05, विठोबा दंत मंजन ऑफीस, वैशालीनगर येथील M/s Achievers Learning Center यांच्याविरुध्द विनापरवानगीने विद्युत खांबावर डिस्प्ले बॅनर / होर्डिग लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

 " चंद्रपुर महानगरपालिका स्तरावरील लोकशाही दिनाबाबत "  

Thu Mar 30 , 2023
चंद्रपूर  :- सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणींची न्याय व तत्परतेने शासकिय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाय योजना म्हणून ‘लोकशाही दिन’ चंद्रपूर शहरमहानगरपालिका कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजीत केला जातो. त्याचप्रमाणे जुन महीन्यातील लोकशाही दिन, सोमवार दि. ३ एप्रिल २०२३ रोजी महानगरपालिका कार्यालयात आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली दुपारी ०१-०० वाजता आयोजीत करण्यात आलेला आहे. लोकशाही दिन प्रसंगी अर्जदारांनी विहीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com