बेला :- आदिवासीबहुल कवडापूर येथील लोकजीवन आदिवासी प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसानचे प्रणेते, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करून त्यांची जयंती उत्साहात साजरी केली. यावेळी हातात खराटे घेऊन शाळा व परिसराची त्यांनी साफसफाई केली.
अंबुजा फाउंडेशनचे प्रक्षेत्र अधिकारी गजानन गायकवाड, प्रतिष्ठित नागरिक आकाश वलके, विकास कुसराम, प्रफुल शेंद्रेरे उपस्थित होते. मुख्याध्यापक सुशील मून यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन सुरेश बनसोडे यांनी केले. लोकजीवन संस्थेच्या अध्यक्ष वर्षा बाभुळकर,सचिव सुबोध देशमुख व संचालक राजीव देशमुख यांनी बालकांना शुभेच्छा दिल्या.