संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 अंतर्गत येणाऱ्या यशोधरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रवेश नगर येथे अल रहमान हॉटेल मागे अवैधरीत्या सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड घालण्यात डीसीपी पाच पथकाला यशप्राप्त झाले असून या धाडीतून 21 जुगाऱ्यांना ताब्यात घेत नगदी 41 हजार 200 रुपये,विविध कंपनीचे 18 महागडे मोबाईल किमती 1 लक्ष 55 हजार 500 रुपये,चार मोटर सायकल किमती 2 लक्ष 10 हजार ,52 तास पत्ते व इतर साहित्य असा एकूण 4 लक्ष सात हजार 195 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाहीत आरोपी किशोर सोंनकुसरे वय 60 वर्षे रा प्रवेशनगर व इतर 20 आरोपी असे एकूण 21 आरोपीवर भादवी कलम 4,5 महाराष्ट्र जुगार बंदी कायदा अनव्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आला. ही यशस्वी कारवाही डीसीपी निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनार्थ डीसीपी पाच चे पथकातील एपीआय जितेंद्र ठाकूर, योगेश ताथोड,अंकुश गजभिये,रवी शाहू, अरुण चांदणे आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे.