संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी पंचायत समिति अंतर्गत रामक्रीष्ण शारदा मिशन ॲाफ होम सायन्स विद्यालय,कामठी येथे मतदान वाढीसाठी मतदान नृत्य,मतदानाच्या लग्नाचे निमंत्रण, पथनाट्य,गीतगायन, प्रतिज्ञा व संकल्प पत्र विशेष अभियान राबविण्यात आले.
आज एप्रिल२०२४ ला स्वीप अंतर्गत पंचायत समिती कामठी अंतर्गत होम सायन्स विद्यालय कॅन्टोनमेंट क्षेत्र येथे मागील निवडणुकीत या क्षेत्रात १०% मतदान झाल्याने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पथनाट्याचे सादरीकरण केले.तसेच शिक्षकाचे “स्वरचित”मतदानावर आधारीत गीतगायन केले.ईयत्ता ७ वीचे लघुनाट्य प्रेरणादायी होते.३०० विद्यार्थी,५० शिक्षक तसेच कॅन्टोनमेंट क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पालकांकडुन रोजच आपले लाड पुरविणारे विद्यार्थी आता संकल्प पत्राद्वारे मतदान करण्याचे आव्हान करणार आहेत.
सौम्या शर्मा,जिल्हा नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.नागपुर,गटविकास अधिकारी प्रदिप गायगोले, संगिता तभाने,गटशिक्षणाधिकारी तथासहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी ,रवि नन्होरे,अतुल आदे यांच्या सहकार्याने हे उपक्रम घेण्यात आले.यामध्ये शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग होता.यावेळी सर्व पालकांना मतदान करण्यास लावु असा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.या उपक्रमात लोकल मिलिटरी अॅथॅारीटी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.