नागपूर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक १५.०४.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे इमामवाडा, नागपूर ये हद्दीत शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे मयुर वल्द सुरेश फुले, वय २७ वर्षे, रा. रामबाग, मिलींद बौध्द विहारजवळ, पोलीस ठाणे इमामवाडा, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम, १९८१ अंतर्गत दिनांक १५.०४.२०२४ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला. त्यास दि. १५.०४.२०२४ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.
मयुर वल्द सुरेश फुले, याचेविरूध्द पोलीस ठाणे इमामवाडा येथे गैरकायदयाची मंडळी जमवुन खून करणे, खुनाचा करण्याचा प्रयत्न करणे, आपखुशीने घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, आपखुशीने घातक शस्त्राने दुखापत करणे, शांतता भंग करण्याचे उद्द्देशाने जाणीवपुर्वक अपमान करणे, जबरी चोरी करतांना आपखुशीने दुखापत करणे, दुखापत, हमला किंवा गैरनिरोध करण्याची पूर्व तयारी करून नंतर रात्रीच्या वेळी चोरटे गृह अतिक्रमण करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, अपराधीक जिवे ठार मारण्याची धमकी देणे, अश्लिल शिवीगाळ करणे, प्राणघातक शस्त्र जवळ बाळगणे, मनाई व हद्यपार आदेशाचे उल्लघंन करणे, इत्यादी मालमत्ता आणि शरीराविरूध्दचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदर स्थानवध्द इसमाविरूध्द पोलीस ठाणे इमामवाडा अंतर्गत सन २०२० मध्ये कलम ११० (६) (ग) सीआरपीसी नुसार प्रतिबंध कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस उप आयुक्त परि. क. ४ नागपूर शहर यांचे हदपार आदेशान्वये ०६ महिण्याकरिता हदपार करण्यात आले होते, त्यानंतर सन २०२१ मध्ये कलम ११० (ई) (ग) सीआरपीसी नुसार प्रतिबंध कारवाई करण्यात आली होती. परंतु त्याने आपली गुन्हेगारी प्रवृत्ती सुरूच ठेवल्याने सन २०२२ मध्ये एमपीडीए कायदयांतर्गत अन्वये ०१ वर्षांकरिता स्थानबध्द करण्यात आले होते, स्थानवध्टतेचा ०१ वर्षांचा कालावधी पूर्ण करून सुटुन आल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हे करणे सुरूच ठेवल्याने २०२३ मध्ये कलम ११०(ई) (ग) सीआरपीसी अन्वये प्रतिबंधक करवाई करण्यात आली होती व त्याचे कडून २५,०००/- रक्कमेचे ०२ वर्षांकरता अंतिम बंधपत्र घेण्यात आले होते. त्याचेवर केलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम झाला नाही. सदर बंधपत्राचे उल्लंघन करून सदर प्र. स्था, इसमाने पोलीस ठाणे इमामवाडा हद्दीत अश्लिल शिवीगाळ करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणीवपुर्वक अपमान करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, आपखुशीने गंभीर दुखापत करणे, आपखुशीने दुखापत करणे, घातक शख जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी अशा स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.
अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे मयुर वल्द सुरेश फुले, याची अपराधीक कृत्ये निरंतर वाढत असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस ठाणे इमामवाडा नागपूर शहर यांनी नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हेशाखेतील एम. पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता त्यांनी वर नमुद स्थानबध्द इसमाविरूध्द स्थानबध्दतेया आदेश पारित करून त्यास छत्रपती संभाजीनगर, मध्यवर्ती कारागृह, हसुल येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत, त्याअन्वये वर नमुद इसमाविरूध्द स्थानबध्दतेची महत्वपुर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.