संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 5 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रनाळा येथील पंकज हॉल समोर एका भामट्या महिलेने जयभीम चौक रहिवासी 85 वर्षीय वृद्ध महिलेला कोरोनाचे पैसे मिळत असल्याची बतावणी करून आधी सहा हजार रुपये भरल्यास आपल्याला 1 लक्ष 30 हजार रुपये भेटतील असे सांगून तिच्या गळ्यातील सोन्याचे 28 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढून फसवणूक करीत घटणास्थळाहुन पळ काढल्याची घटना काल सायंकाळी साडे चार दरम्यान घडली असून फसवणूक झालेल्या या वृद्ध महिलेचे नाव कांताबाई लक्ष्मण गोंडाने वय 85 वर्षे रा जयभीम चौक कामठी असे आहे.यासंदर्भात फिर्यादी कांताबाई गोंडाने ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी महिलेविरुद्ध भादवी कलम 420 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राप्त माहिती नुसार सदर पीडित फिर्यादी ह्या काल दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी त्यांचे घरी येत असताना कामठी कळमना रोडवर जय भीम चौक जवळ एक अनोळखी महिला हिरवे रंगाची साडी नेसलेली डोक्याला काळे पांढरे रंगाचा दुपट्टा बांधलेली व अंदाजे 40 वर्षाची फिर्यादी यांना भेटली व त्यांना म्हणाली की त्यांचे कोरोनाचे पैसे मिळणार आहेत त्यासाठी त्यांना अगोदर सहा हजार रुपये भरावे लागतील व त्यानंतर एक लाख तीस हजार रुपये त्यांना मिळतील फिर्यादीने त्या महिलेवर विश्वास ठेवून स्वतःकडचे अंगावरील सोन्याचे दागिने आरोपी महिलेच्या म्हणण्याप्रमाणे गहाण ठेवने कामे आरोपी महिलेला दिले व ते ती आरोपी महिलेसोबत पंकज हॉल या ठिकाणी गेली असता आरोपी महिलेने फिर्यादी महिलेला शंभर रुपये देऊन त्या ठिकाणी बसविले व फिर्यादी महिलेचे कानातील दोन सोन्याचे फुल चार ग्रॅम किमती 16 हजार रुपये व गळ्यातील डोरले 20 मनी असे तीन ग्रॅम असलेले किंमती 12 हजार रुपये असे एकूण 28 हजार रुपये दागिने घेऊन सदर महिला ही फिर्यादीची फसवणूक करून तिथून निघून गेली .बराच वेळ होऊनही महिला परत न आल्याने प्रतीक्षेत असलेल्या या वृद्ध महिलेला घरी जाण्याचा रस्ता गवसत नसून अश्रू अनावर होत नव्हते दरम्यान त्याच मार्गाने जात असलेले पोरवाल कॉलेज चे प्राध्यापक पराग सपाटे तसेच दूध विक्रेता नितीन कांबळे यांनी त्या वृद्ध महिलेची विचारपूस केल्यानंतर वृद्ध महिलेने आपबीती सांगीतले यावर दुःख व्यक्त करीत सपाटे यांनी त्वरित पोलीस स्टेशन ला माहीतो देताच पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पिल्ले आदींनी घटनास्थळ गाठले व फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी महिला विरुद्ध भादवी कलम 420 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.