नागपूर – दि. 07.02.2022 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या प्राप्त खबरे वरून पो.स्टे. गणेषपेठ हद्यीत संत्रा मार्केट, षिवषक्ती रेस्टॉरंट एंड भोजनालय समोर, रोडवर, पोस्टे. गणेषपेठ, नागपूर शहर येथे सापळा रचुन आरोपी नामे 1) शिवशंकर चंद्रभान कांद्रीकर वय 34 वर्ष रा. विठ्ठल रूक्मीनी मंदीर जवळ, खडकाडी मोहल्ला, गोळीबारी चौक, पो.स्टे तहसील, नागपूर शहर 2) संगीता राजेंद्र महेश्वरी वय 41 वर्ष रा. अयोध्या नगर, साई मंदीर जवळ, प्लॉट नं. 81 ए, पो.स्टे. हुडकेेष्वर, नागपूर शहर 3) आकाश चंद्रकांत ढेकळे वच 37 वर्ष, प्लॉट नं. 212, एम.आय.जी. कॉलोनी वकीलपेठ, रेशीमबाग चौक, पो.स्टे.इमामवाडा, नागपूर यांचे ताब्यातुन 57 ग्रॅम मेफेड्रोन एम.डी. ड्रग्स पावडर किं.अं. . 5,70,000/- रूपये व चार मोबाईल विविध कंपनीचे एकून कि.अं 31,000/-रू, व होंडा सिटी कार क्र . एम.एच. 49 बी.के. 3798 कि.अं. 10,00000/-रू तसेच नगदी 17,000/-रू. असा एकुण 16,18,000/-रू चा मुद्देमाल मिळुन आल्याने तो अंमली पदार्थ विरोधी कायदयान्वये जप्त करून आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांचे विरोधात कलम 8(क),22(क),29 एन.डी.पी.एस. अँक्ट अन्वये पोलीस स्टेशन गणेषपेठ येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन. सदर गुन्हयामध्ये नमुद आरोपीतांना अटक करण्यात आली असुन नमुद आरोपीतांचा दिनांक 10/02/2022 पोवेतो पी.सी.आर प्राप्त करण्यात आला आहे. पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नागपूर शहर करित आहे.
सदरची कारवाई नागपूर शहराचे अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) सुनिल फुलारी यांचे निर्देशान्वये पोलीस उप-आयुक्त(डिटेक्शन) डॉ. अक्षय शिंदे, सहायक पोलीस आयुक्त(गुन्हे) रोशन पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज सिडाम, सपोनि सुरज सुरोशे, सपोनि बद्रीनारायण तांबे, पोहवा प्रमोद धोटे, पोहवा प्रदिप पवार, पोहवा राजेश देशमुख, पोहवा नामदेव टेकाम, पोहवा समाधान गिते, पोहवा सुनिल इंगळे नापोशि विनोद गायकवाड, नापोशि विवेक आढाउ, पोशि नितीन मिश्रा, पोशि अश्विन मांगे, पोशि समिर शेख, पोशि सहदेव चिखले, पोशि राहुल पाटील, मपोशि रूबीना शेख यांनी कामगिरी केलेली आहे.