होळी साजरी करा जपून: मोकळ्या मैदानाचा वापर करा, महावितरणचे आवाहन

नागपूर :- आनंद, उत्साह आणि उल्हास यांचा सण म्हणजे होळी. आपल्याकडे धुळवड व रंगपंचमी अशा दोन्ही दिवशी रंगोत्सव जल्लोषात साजरा होतो. आयुष्यात आनंद देणाऱ्या रंगांना या दिवशी विशेष महत्त्व आहे. त्यांची उधळण केलीच पाहिजे, पण जरा जपून. आपली आणि इतरांचीही काळजी घेत रंग उधळले, तर रंगपंचमी नक्कीच आनंददायक होऊ शकेल. होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटवितांना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेत होळीचा आनंद व्दिगुणित करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

होळी पेटविताना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहीत्रे नाहीत याची खातरजमा करून घ्या, अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जीवंत तार खाली पडून भीषण अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय अनेक ठिकाणी वीजवाहिन्या भूमिगत असल्याने, त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी जेणेकरून होळीच्या उष्णतेपासून भूमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील, होळी पेटविताना शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करा, ट्रक किंवा इतर वाहनांतून होळी आणताना होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही याची खबरदारी घ्या, विजेचे अपघात हे प्राणघातक असल्याने एक चूकही प्राणांतिक अपघातास कारणीभूत ठरू शकते.

होळीच्या रात्री बरेचदा रस्त्यावर होत असलेल्या हुल्लडबाजीचा फ़टका परिसरातील वीज ग्राहकांनाही होत असतो, बेधुंद वाहन चालकांमुळे अनेकदा वीज वितरण यंत्रणेचे नुकसान होण्यासोबतच जीवित व वित्त हानी होण्याचा धोका असल्याने याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्यासोबतच नियोजित कार्यक्रमस्थळी वीज उपकरणांची योग्य तपासणी करून घ्या, उत्सवप्रिय जमतेच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना टाळून त्यांना होळीचा आनंद घेता यावा यासाठी आयोजकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे रंगोत्सव साजरा करताना पाण्याचे फवारे वीजवाहिन्यापर्यत उडणार नाही याची काळजी घ्या. रंग भरलेले फुगे फेकताना ते वीजेचे खांब आणि वीजवाहिन्या यांना लागणार नाही याची खबरदारी घ्या. वीज वितरण यंत्रणेचे रोहीत्रे व तत्सम वितरण उपकरणे बसविलेल्या जागेपासून लांब अंतरावर रंग खेळा. रंग खेळताना ओल्याचिंब शरीराने वीज खांबाला स्पर्श झाल्यास अपघाताचा संभाव्य धोका असल्याने विजेचा खांबांना स्पर्श करू नका. वीजेच्या खांबाभोवती पाण्याचा निचरा होणार नाही याची खबरदारी घ्या. घरात होळी खेळताना वीज मिटर, वीजेचे प्लग, वीजतारा आणि वीज उपकरणांचा पाण्यापासून बचाव करा, ओल्या हाताने वीजेच्या बटनांना स्पर्श करू नका. होळीचा सण हा आनंदाचा रंगोत्सव असल्याने खबरदारी घेऊन होळीचा सण साजरा करून आनंद व्दिगुणीत करा. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता 24 तास सुरू असणारे निशुल्क क्रमांक 1912, 19120, 18002123435 किंवा 18002333435 यावर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरनच्या वतीने करण्यात आले आहे.

सुरक्षित आणि आनंदी होळी!

• होळी आणतांना तीचा स्पर्श वीज वाहिन्यांना होऊ नये.

• विजेच्या खांब आणि वीजवाहिन्या पासून दूर रहा.

• वीज वितरण यंत्रणा पासून लांब अंतरावर होळी पेटवा.

• वीज वाहिन्या, वितरण रोहीत्रांवर पाणी फेकू नका.

• रंगीत पाणी वीज उपकरणांवर टाकू नका.

• ओल्या हाताने वीज उपकरणांना स्पर्श करू नका.

• वीज खांबाभोवती पाण्याचा निचरा करु नका.

• वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या तात्काळ मदत कक्षाला संपर्क साधा.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, नागपूर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

न्यायमूर्ती भूषण गवई यांची २५ ते ३१ मार्च दरम्यान संयुक्त राष्ट्र अमेरिकेला भेट

Wed Mar 20 , 2024
– कोलंबिया लॉ स्कूल, हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये व्याख्यान नागपूर :- सर्वोच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती भूषण गवई हे २५ ते ३१ मार्च या कालावधीमध्ये संयुक्त राष्ट्र अमेरिकेला भेट देणार आहेत. या भेटीमध्ये न्यूयॉर्क येथील कोलंबिया लॉ स्कूल आणि केंब्रिजमधील हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कोलंबिया लॉ स्कूल आणि हार्वर्ड केनेडी स्कूल कडून मा.न्यायमूर्ती बी.आर. गवई यांना व्याख्यानासाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com