नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे सर्व जनतेला होळी व धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा. शुक्रवारी १४ मार्च रोजी धुलीवंदन पर्यावरणपूरक रित्या साजरे करा, पाण्याचा वापर काटकसरीने करा, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
धुलीवंदन साजरे करताना पाण्याचा वापर जपून करावा तसेच रासायनिक रंगांचा वापर करू नये. त्याऐवजी पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांचा वापर करावा. प्राणी, पक्षी यांच्यावर रंग टाकू नका. होळी हा आनंदाचा सण आहे. रंगपंचमीच्या उत्सवात अप्रिय घटना टाळाव्यात. आरोग्याच्या दृष्टीने रंगपंचमीला नैसर्गिक रंगाचा वापर करावा पर्यावरणपुरक धुलीवंदन उत्सव नागपूरकरांनी साजरा करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.