नागपूर :- शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथील सुयोग पत्रकार निवासस्थानी सदीच्छा भेट देत पत्रकारांशी संवाद साधला. सुयोग पत्रकार निवासस्थानी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, मराठी भाषा विभागाचे विभागीय सहायक संचालक सुर्यवंशी, सुयोग पत्रकार निवासस्थान प्रमुख विवेक भावसार आदी उपस्थित होते. भेटीदरम्यान मंत्री दीपक केसरकर यांनी सुयोग निवासस्थान येथील पत्रकारांच्या सुविधांबाबत माहिती […]

नागपूर : महाराष्ट्र राज्य गावं कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने गुरुवारी २२ डिसेंबर रोजी विधानभवनावर भव्य मोर्चा धडकणार. गेल्या काही वर्षापासून शासनाकडे प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातून सर्व 34 जिल्ह्यामधून सर्व पोलीस पाटील नागपूर शहरात या मोर्चामध्ये सहभागी होतील. जवळजवळ पंधरा ते वीस हजार लोकसंख्या यामध्ये सहभाग घेणार असल्याचे विजयराव घाडगे यांनी पत्रपरिषदेचे सांगितले. महाराष्ट्र राज्य गांव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने […]

– विरोधकांनाही योग्य संधी देण्याची आवश्यकता मुंबई :- राज्याचे हिवाळी अधिवेशन गेल्या दोन वर्षांच्या खंडानंतर नागपूरमध्ये होत आहे.विरोधकांनी अधिवेशनादरम्यान सत्ताधाऱ्यांना विविध मुद्दयांवर घेरण्याची पुर्ण तयारी केली आहे. सभागृहाच्या कामकाजात विरोधकांसह सत्ताधाऱ्यांना योग्य न्याय देण्याची जवाबदारी त्यामुळे विधानसभा अध्यक्ष तसेच विधान परिषदेच्या सभापतींचे असते.पंरतु, अध्यक्ष आणि सभापती सभागृहातील सदस्यांमधूनच निवडले जात असल्याने पक्षासोबत असलेल्या बांधिलकीमुळे ते निपक्षपाती काम करू शकत नाहीत. […]

नागपूर : राज्यातील अनुसूचित जाती वस्ती योजनेतील कामांमध्ये दुबारता टाळावी आणि कामामध्ये पारदर्शकता यावी यासाठी या योजनांच्या माहितीचे जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे काम गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य लहू कानडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवेळी मंत्री संजय राठोड बोलत होते. अनुसूचित जाती वस्ती विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या […]

नागपूर : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आरोपीला लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधानसभा सदस्य अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सुचनेवेळी झालेल्या चर्चेस उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, श्रद्धा वालकर घटना ही […]

नागपूर  : रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पदपथ, रस्ते, उड्डाणपूल यांचे सुशोभीकरण आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण या सर्व कामांमुळे मुंबई बदलत आहे. मुंबईकरांच्या कल्याणासाठी आगामी काळात अशाच गतिमानपणे मुंबईचा कायापालट करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. मुंबई मालमत्ताकर विधेयकावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, मुंबईच्या विकासासाठी दिलेला शब्द आम्ही पाळला […]

नागपूर : राज्य शासनाच्या अंगीकृत वीज वितरण, महानिर्मिती कंपनीमध्ये कनिष्ठ व सहायक अभियंता पदाच्या भरतीची जाहिरात महानिर्मिती कंपनीमार्फत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील गट अ आणि ब वर्गासाठी अधिवास प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. याबाबत ५ डिसेंबर २०२२ रोजी शासन निर्णयात सुधारणा करण्यात आली आहे. तसेच सेवा प्रवेश नियमात ही सुधारणा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. याबाबत सदस्य चेतन […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  नागपूर दि. 20 डिसेंबर –  राज्यातील शाहिरांच्या समस्यांची शासनाला जाणीव असून त्या समस्यांवर सकारात्मक निर्णय घेत मार्ग काढला जाईल. अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्य विघिमंडळाच्या अधिवेशनात मोर्चा घेऊन आलेल्या भारतीय कलाकार शाहीर मंडळ आणि महाराष्ट्र शाहिर परिषदेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना ते बोलत होते. यावेळी बोलतांना सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की महाराष्ट्राच्या […]

मोतीराम रहाटे, प्रतिनिधी  कन्हान : – क्रीडा व सांस्कृतिक संचालना लय, महाराष्ट्र राज्या व्दारे आयोजित विदर्भ विभागीय क्रीडा स्पर्धा, वर्धा जिल्हयातील देवळी येथे संपन्न झाली. यात धर्मराज विद्यालयाच्या विद्यार्थी खेडाळु तन्मय चरडे हयाने प्रथम क्रमाक पटकावित राज्य स्पर्धेत प्रवेश निश्चित केल्याने तन्मय चरडे चे अभिनंदन करून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे. विदर्भ विभागीय क्रीडा स्पर्धा वर्धा जिल्हयातील देवळी येथे मंगळवार […]

नागपूर, दि. 20 : राज्यातील विविध विकास कामे गतीने व्हावीत, यासाठी सीएम वॉर रूम स्थापन करण्यात आली आहे. मुंबईतील महत्त्वाच्या कामांवरही या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार असल्याने विकास कामे करताना विलंब होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. धोकादायक म्हणून जाहीर केलेला अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोपाळकृष्ण गोखले पूल पुर्नबांधणीसाठी 7 नोव्हेंबर 2022 पासून संपूर्णतः बंद करण्यात […]

नागपूर :- कोंबडीचे पस्तीस तुकडे करताना सुध्दा दहा वेळा विचार केला जातो, इथं तर मुलीचे पस्तीस तुकडे करण्यात आले आहेत. हे खूप वेदनादायी आहे, श्रध्दा वालकरचा खून ही माणूसकीला काळीमा फासणारी घटना आहे. श्रध्दाच्या खुनाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा, केंद्रसरकारशी, केंद्रीय गृहमंत्र्यांशी समन्वय साधून नराधम खुन्याला तातडीने फासावर लटकवा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात आज केली. […]

भंडारा, दि. 20 : भंडारा वनविभागातील शीघ्र कृती दलात कार्यरत वाहनचालक अनिल शेळके यांना वन्यजीवांच्या संरक्षणात धाडसी व उत्कृष्ट कार्याबद्दल नुकतेच रजत पदक जाहीर झाले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह नागपूर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात ‘रजत पदक’ देऊन शेळके यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाला प्रधान सचिव (वने) बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक(वनबल प्रमुख) वाय .एल. पी. […]

नागपूर :- महाराष्ट्रातील हिंदू तरुणी श्रद्धा वालकरचे 35 तुकडे करणारा धर्मांध आफताब आणखी 20 मुलींना फसवतो. ‘फाशी झाली तरी ‘जन्नत’ मध्ये 72 सुंदर ‘हूर’ मिळतील’, असे तो निर्लज्जपणे सांगतो. यातून ‘हे प्रेम नव्हे, तर षड्यंत्र आहे’, हे लक्षात येते. श्रद्धा वालकरचे प्रकरण शांत होत नाही, तोच झारखंड राज्यातील रबिका या हिंदू तरुणीचे दिलदार अन्सारी या धर्मांधाने 50 तुकडे केल्याची अत्यंत […]

बेला : लोकजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ,राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक तथा पंचक्रोशीतील शिक्षण महर्षी दिवं. चंपतरावजी देशमुख यांचा प्रथम स्मृतिदिन लोकजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला व त्यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य सुनील मुलेवार होते. मंचावरील अतिथी प्रा. नितीन पुरी, पर्यवेक्षक मिलिंद शाव, लक्ष्मण खोडके गणेश लांबट आरती मुलेवार यांनी आपल्या कविता व भाषणातून देशमुख […]

नागपूर : ‘पोहा चालला महादेवा’ सारख्या अजरामर नाट्यकृतीने महाराष्ट्राच्या रंगभूमीवर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ रंगकर्मी मदन गडकरी यांच्या निधनाने वैदर्भीय रंगभूमी ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकली असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, या शब्दात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत. मदन गडकरी यांनी जवळपास सात दशके रंगभूमीची सेवा केली. त्यांच्या तालमीत तयार झालेले अनेक […]

नागपूर, दि. 20 : चंद्रपूर येथील मलनि:स्सारण वाहिनी व सांडपाणी पाणी प्रकल्प (एसटीपी 24 एमएलडी) या कामाच्या गैरव्यवहाराबाबत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे. याबाबत योग्य ती चौकशी करून त्यामध्ये काही चुका आढळून आल्यास कारवाई केली जाईल. याबाबतचा अहवाल आल्यानंतर तो तपासून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. या विषयासंदर्भात सदस्य विजय […]

नागपूर दि. २०: स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी करण्यासंदर्भात तात्काळ बैठक घेण्यात येईल आणि या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य छगन भुजबळ यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय […]

नागपूर दि. २० : येथील विधिमंडळाच्या विस्तारीत इमारतीमध्ये आज हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला. हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांना बाळाची काळजी घेता यावी, यासाठी आज विधानभवनात हिरकणी कक्षाची सुरूवात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार अहिरे यांच्याच हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.          […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 20 :- कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतून सरपंच तसेच सदस्यपदासाठी 122 मतदान केंद्रावर झालेल्या मतदानात एकूण 68 हजार 185 मतदारांपैकी 50 हजार 689 मतदारांनी मतदान केले असून या मतदानाची आज 20 डिसेंबर ला सकाळी 10 वाजेपासून कामठी तहसील कार्यालयाच्या मतमोजणी केंद्रावर मतमोजणीस सुरुवात करण्यात आली असून मतमोजणीनुसार 27 ग्रा प च्या 27 […]

राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत विधानभवन येथे ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गाचा प्रारंभ नागपूर :- विधिमंडळात विविध संसदीय आयुधांचा वापर करून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले जातात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला समर्पक राज्यघटना दिली आहे. या राज्यघटनेनुसार देशाचा कारभार चालतो. आपली लोकशाही जगात आदर्शवत मानली जाते. देशातील अगदी सर्वसामान्य माणूससुद्धा सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो, हे आपल्या प्रगल्भ लोकशाहीचे प्रतीक आहे, तसेच आपल्या […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com