हळदी कुंकूच्या प्रथेचे महत्व अजूनही कायमच – छाया मदनकर 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-रणाळ्यात हळदी कुंकू कार्यक्रम

कामठी :- पारंपरिक सणांना आधुनिकतेची झालर चढली असली तरी अजूनही स्त्रियांनी अनेक पारंपरिक सणांचे महत्व कायम ठेवले आहे त्यापैकी एक म्हणजे मकरसंक्रांती निमित्त साजरा करण्यात येणारा हळदीकुंकू कार्यक्रम होय.पूर्वी चूल आणि मुलं एवढेच स्त्रियांचे कार्यक्षेत्र होते .

चार भिंतीच्या आत कोंडल्या गेलेल्या स्त्रियांना हळदी कुंकुसाठी बाहेर पडता यायचे .आता परिस्थिती बदललेली असली तरी हळदीकुंकूच्या प्रथेला मात्र अजूनही तितकेच महत्व असल्याचे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्षा छाया राजु मदनकर ह्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने रणाळा येथील गणेश मंदिराच्या पटांगणात आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात व्यक्त केले.

कार्यक्रमाचे उदघाटन रत्नकला लांजेवार यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी नागपूर जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा निशा सावरकर,रणाळा ग्रा प उपसरपंच अंकिता तळेकर, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर चे अध्यक्ष राजु मदनकर, संचालक प्रवीण उराडे, संजय महाकाळकर,नागपूर महानगर पालिकेच्या नगरसेविका परिणिता परिणय फुके, कामठी पंचायत समितीच्या माजी उपसभापती विमल साबळे,रणाळा ग्रा प सरपंच पंकज साबळे, सदस्य स्वप्नील फुकटे, बाल्या सपाटे, येरखेडा ग्रा प सरपंच सरिता रंगारी,विजय कोंडुलवार,विठ्ठल विघे ,सागर मदनकर आदी उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com