संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 23 :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बी बी कॉलोनी येरखेडा येथील एका घरात कुणी नसल्याचे संधी साधुन अज्ञात चोरट्याने अवैधरित्या घरात शिरून घरातील सोन्या चांदीचे दागिने तसेच नगदी 15 हजार रुपये असा एकूण 64 हजार रुपयेचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना भर दुपारी 1 वाजता घडली असून यासंदर्भात फिर्यादी मोहम्मद उबेद अख्तर मोईन अखतर वय 26 वर्षे रा बी बी कॉलोनी कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.