मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने मंत्रालयात ग्रंथप्रदर्शन व विविध कार्यक्रम

मुंबई : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून दि. २३ ते २५ जानेवारी, २०२३ या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सकाळी ११:०० ते दुपारी ४:०० या कालावधीत “चालता बोलता” या प्रश्नसरितेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, दि. २३ ते २५ जानेवारी, २०२५ या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार, दि. २४ जानेवारी, २०२३ रोजी परिषद सभागृह, मंत्रालय येथे दुपारी २:०० वाजता मंत्रालयातील आणि विभागाच्या अधिनस्त कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार, दि. २५ जानेवारी, २०२३ रोजी दुपारी ४:०० ते सायंकाळी ५:१५ वाजेपर्यंत “हास्यसंजीवनी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तद्नंतर, सायंकाळी ०५:३० ते ६:०० या कालावधीत अभिवाचन स्पर्धेचा बक्षिस समारंभ होऊन कार्यक्रमाची सांगता होईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपाल आम्हालाच सांगत होते 'मुझे जाने का है' ;आता त्यांच्या विनंतीचा विचार करावा - जयंत पाटील

Tue Jan 24 , 2023
मुंबई – राज्यपाल यापूर्वी आम्हालाच सांगत होते मुझे जाने का है… आता लेखी विनंती केली आहे तर केंद्रसरकार लेखी निवेदनातील विनंतीचा विचार करेल असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान यांना निवेदन देऊन महाराष्ट्रातून जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com