कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत जमीन विक्रीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत

गडचिरोली : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील दारीद्रयरेषेखालील भूमिहीन कुटुंबाना शासनामार्फत 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर ओलिताखालील जमीन 100 टक्के अनुदानावर उपलब्ध करुन द्यायची आहे.

सदर जमीन शासनाने लाभार्थ्यांना खरेदी करुन द्यावयाची आहे. त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना जमीन विकावयाची आहे त्यांनी विकत असलेल्या जमीनीचा 7/12, जमिनीचा नकाशा,धारण करीत असलेल्या जमीनीचा तपशील (नमुना 8- अ),जमीन मोजणी “क” प्रत,गाव नकाशा, रु. 100 च्या स्टँम्पपेपरवर शपथपत्र इत्यादी माहितीसह जमीन विक्रीबाबतचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,गडचिरोली यांचे कार्यालयास सादर करावा. शासन निर्णय दि.14 ऑगस्ट 2018 नूसार जमीन खरेदीबाबतची कार्यवाही करण्यात येईल.अधिकच्या माहितीसाठी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,गडचिरोली यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा असे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,गडचिरोली यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

"परीक्षा पे चर्चा" पर्व-6 उपक्रमांतर्गत इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Tue Jan 24 , 2023
गडचिरोली : परीक्षा पे चर्चा-6 या कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व व्यवस्थापनातील माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणेत येणार आहे. या स्पर्धेसाठीचे खर्च निकष व विषयसूची दिली आहे. सर्व माध्यमांच्या शाळांमधील इ.9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी दिनांक 25 जानेवारी 2023 ला सकाळी 9.00 वाजता चित्रकला स्पर्धेचे आयोजन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights