I arrived in good time for the 7:30 am start, transfixed by the sunrise over Lake Michigan and able to secure a prime spot in corral E for a rousing rendition of the Star-Spangled Banner. The first half was like a party and despite the early gun-time, thousands of supporters cheered noisily, ringing bull bells, calling out positive affirmations and […]

Ø विविध सुविधा असलेली सुसज्ज ईमारत प्रवाशांच्या सेवेत Ø ईमारत बांधकामावर 13 कोटी 83 लाख रुपयांचा खर्च यवतमाळ :- यवतमाळ येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने बसस्थानकाची नवीन सुसज्ज ईमारत बांधण्यात आली आहे. 13 कोटी 83 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या ईमारतीचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते दुरदृष्य प्रणालीद्वारे झाले. लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री […]

यवतमाळ :- मृद व जलसंधारण विभागातील जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट-ब या अराजपत्रित पदासाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. त्यानुसार उमेदवारांची गुणनिहाय सुधारित मेरीट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे. या लिस्टमधील उमेदवारांची प्राथमिक स्तरावर कागदपत्र पडताळणी दि.१६ ते १९ आँक्टोंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील वाल्मी या संस्थेच्या ठिकाणी होणार आहे. उमेदवारांनी पडताळणीसाठी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय […]

– समाजातील सर्वच घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न – संजय राठोड यवतमाळ :- पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते दारव्हा तालुक्यातील विविध विकास कामे, बांधकामे, भक्त निवास, डिजिटल क्लासरुम, मोकळ्या जागेचे सौदर्यीकरण अशा कामांचे भूमिपूजन, लोकार्पण आज झाले. समाजातील सर्वच घटकांना दिलासा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे याप्रसंगी पालकमंत्री म्हणाले. यावेळी पालकमंत्र्यांसह माजी जिप सभापती श्रीधर मोहोड, दारव्हा नपचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे […]

– विजयकाका पोफळी लिखित ‘तपोनिधी’च्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन नागपूर :- पंडितकाका धनागरे महाराजांनी आपले जीवन भक्तीमार्गाला समर्पित केले होते. समाज संस्कारित करून आपला विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. विजयकाका पोफळी यांनी पंडितकाका धनागरे महाराजांचे जीवनचरित्र ‘तपोनिधी’मधून मांडले आहे. हे जीवनचरित्र तरुणांना नक्कीच प्रभावित करेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी (रविवार) येथे व्यक्त […]

नागपूर :- भारताचे माजी राष्ट्रपती आणि प्रख्यात वैज्ञानिक ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फ़े त्यांना अभिवादन करण्यात आले. महावितरणच्या काटोल मार्गावरील ‘विद्युत भवन’ कार्यालयात मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन केले. यावेळी अधीक्षक अभियंता सर्वश्री राजेश नाईक, मंगेश […]

मिलींद गाडेकर, वार्ताहर नागपूर :- काल सायंकाळी 5.00वाजता,सहाय्यक अभियंता महादुला/कोराडी,डीसी,महावितरणचे खवसे व ग्रामपंचायत घोगलीचे सरपंच राहुल सोनारे यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत सामान्य निधी मधुन स्ट्रीट लाइट चा लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी, ग्रामपंचायत सरपंचाने सांगीतले की, गा,पं, सामान्यनिधी-2024/25मधुन स्ट्रीट लाइट, पोल, व स्ट्रीट लाइट फेजसाठी7लक्ष31हजार ईतकानिधी खर्ची घातला आहे,, महादूला आदर्श नगर पुलाचे पासून ते महानुभाव पंथाच्या आश्रम पर्यंत लाईट होते मात्र […]

नागपूर :- OCW ने मासिक बिलिंग प्रणाली सुरु केली असून ती ग्राहकांच्या सोयीसाठी टप्प्याटप्प्याने अंमलात आणत आहे. त्रैमासिक बिलिंग सायकलमधून मासिक बिलिंग प्रणालीकडे जाणाऱ्या या बदलाचा उ‌द्देश अधिक सुव्यवस्थित आणि सोयीस्कर पेमेंट शेड्यूल प्रदान करणे आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत, हि सुविधा नागपूर शहरतिल, सध्या त्रैमासिक बिलिंग घेणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी गारिक बिलिंग लागू करण्यात येईल. आम्ही सर्व ग्राहकांना नम्र विनंती करतो […]

नागपूर :- माजी राष्ट्रपती तथा शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आस्थापना उपायुक्त विवेक इलमे, विकास उपायुक्त डॉ. कमलकिशोर फुटाणे यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

– दीक्षाभूमी मेट्रो स्थानकाच्या फलकाचे फीत कापून उदघाटन   नागपूर :- धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या शुभ मुहूर्तावर दक्षिण-पश्चिम नागपूर स्थित पवित्र दीक्षाभूमीवर रहाटे कॉलनी मेट्रो स्थानकाचे नाव “दीक्षाभूमी मेट्रो स्थानक” करण्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते आणि समतेचे खंदे समर्थक तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार भीमपुत्र विनय भांगे यांनी केले. भीमपुत्र भांगे […]

गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई द्वारे उच्च न्यायालय, मुंबई आणि नागपुर व औरंगाबाद खंडपीठ येथे दिनांक ३० नोव्हेंबर, २०२४ व ०१ डिसेंबर, २०२४ रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. उच्च न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडपात्र प्रकरणे विशेष लोकअदालतीमार्फत निकाली काढण्याकरीता विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. उच्च न्यायालय, मुंबई आणि नागपुर व औरंगाबाद खंडपीठ यांनी विशेष लोकअदालतीमध्ये […]

गडचिरोली :- समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ – २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे सिव्हिल लाईन्स येथील वॉकर स्ट्रीट परिसरातील ‘स्मार्ट स्वच्छतागृहाचे’ मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते सोमवारी (ता:१४) लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, उपायुक्त प्रकाश वराडे, डॉ. गजेंद्र महल्ले, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (स्लम) कमलेश चव्हाण, देवेन्द्र भोवते, वॉकर्स क्लबचे प्रशांत उगेमुगे, दिनेश नायडू प्रवीण […]

– आमदार सुधाकर अडबाले यांनी घेतली मनपा आयुक्‍तांसह समस्या निवारण सभा नागपूर :- शालार्थ प्रणालीत समाविष्ठ असलेले शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सहाव्‍या वेतन आयोगाची एकूण ५९ महिन्‍यांची थकबाकीची देयके प्रलंबित असल्‍याने मनपा शिक्षक – कर्मचाऱ्यांत नाराजी व्‍यक्‍त होत आहे. त्‍यामुळे आमदार सुधाकर अडबाले यांनी घेतलेल्‍या बैठकीत सदर विषयावर मनपाने सकारात्‍मकतेने सदर विषय सोडवून मनपा कर्मचाऱ्यांना न्‍याय द्यावा, अशी मागणी केली. यावर सहाव्या […]

– रा. स्व. संघाच्या चंद्रपूर नगर शाखेचा विजयादशमी उत्सव चंद्रपूर :- भारतात विविधता असू शकते. पण त्यातही सर्वांमध्ये एक समान तत्व आहे, ही ठाम भावना आम्हाला राष्ट्र बनवते. सर्वांना सोबत घेऊन, सर्वांचा सन्मान करीत अग्रेसर होणे हीच हिंदू संस्कृती आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हाच विचार आहे. जे भारताचा विरोध करतात ते हिंदुत्वाचा आणि सोबतच संघाचाही विरोध करतात. भारताच्या सांघिकतेवर हल्ला […]

– रंजन कला मंदिराच्या अमृत महोत्सवी वर्षाचे उद्घाटन नागपूर :- प्रतिभाशाली आणि लोकप्रिय होण्यासाठी काय करावे लागेल, याचा विचार करण्याची गरज आहे. कारण रंगभूमीला, नाटकांना लोकाश्रय मिळाला तरच नाटक आणि कलावंत पुढे जाईल. त्यासाठी रंजन कला मंदिरासारख्या संस्थांकडून प्रबोधन आणि प्रशिक्षण खूप आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) येथे केले. […]

– विकास कामांना सर्वांनी सहकार्य करावे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन मुंबई :- राज्य शासनामार्फत अनेक विकास कामे व प्रकल्प राबविण्यात येत आहेत. विकास कामांतून नागरिकांचे जीवनमान उंचावणार असल्याने या विकास कामांना सर्वांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतांना केले. राज भवन येथे झालेल्या या बैठकीस माजी राज्यपाल राम नाईक, खासदार अनिल […]

नागपूर :- महाराष्ट्र राज्यातील मनपा परिवहन सेवेतील विशेषतः बस सेवेत कार्यरत असलेल्या चालक वाहक कर्मचाऱ्यांची गेल्या १५ वर्षांपासून पगार वाढीची मागणी प्रलंबित होती. १५ वर्षांच्यां वेतन निश्चितीद्वारे हे समस्त चालक वाहक कार्यरत होते व तुटपुंज्या पगारात कुटुंबाचा सांभाळ करत होते. या सोबतच अनेक आर्थिक अडचणीना देखील त्यांना समोर जावं लागत होते. मागील अनेक महिन्यांपासून शासन स्तरावर याबाबतीत प्रयत्न सुरू होते. […]

मुंबई :- केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं आज दुपारी पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. आज महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे त्यापूर्वी राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावर हायकोर्टात तातडीच्या सुनावणीची शक्यता आहे. 7 विधानपरिषद आमदारांच्या शपथविधीविरोधात शिवसेना ठाकरे गट पुन्हा हायकोर्टात गेला असून याविरोधात याचिका दाखल करण्यात […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com