इमलीबाग येथे 1 लक्ष 61 हजार रुपयांची घरफोडी..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 16 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या इमलिबाग येथील बाबा कलेक्शन नामक दुकानासमोरील कुलूपबंद घरात अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दाराचे कुलुप तोडून अवैधरित्या घरात प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी पेटी उघडून पेटित ठेवलेले नगदी 1 लक्ष 21 हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 1 लक्ष 61 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गतरात्री साडे दहा दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी मो खालीद सलाउद्दीन अन्सारी वय 24 वर्षे रा इमलिबाग कामठी ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 457,380 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Next Post

कन्हान चे आठ कराटे खेडाळुनी नऊ पदक पटका वित राज्य स्पर्धेकरिता निवड.

Mon Oct 17 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  दि.५ व ६ नोहेंबर ला औरंगाबाद येथे राज्य कराटे स्पर्धा.  कन्हान : – कराटे डू असोशिएशन ऑफ नागपुर डिस्ट्रि क्ट (नागपुर जिल्हा कराटे कृती संघटना) व्दारे १३ वर्षा च्या लहान वयोगटातील जिल्हास्तरिय निवड कराटे स्पर्धा नागपुर विभागीय स्पोर्टस कॉन्प्लेक्स चे जाकिर खान यांच्या अध्यक्षेत संपन्न झाल्या, यात कन्हान च्या आठ कराटे खेडाळुनी सहभाग घेत नऊ पदक पटकावित […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com