स्थानिकांचे आपातकालीन परिस्थितीत सहकार्य अपेक्षित , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आयोजित शिबिराचा 10 वा दिवस

नागपूर – नैसर्गिक आपत्तीची माहिती देण्यासाठी व सामना करण्यासाठी आपदा मित्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे नुकतेच उदघाटन करण्यात आले. 12 दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा आज दहावा दिवस आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनात सुरु असलेल्या या प्रशिक्षणात पुरपरिस्थिती व आपातकालीन परिस्थितीबाबत आपदा मित्रांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. सोबतच राज्य आपत्ती आपत्ती दल आपातकालीन परिस्थितीत स्थानिकांचा सहभाग कशा पध्दतीने असावा, याबाबत मार्गदर्शन करीत आहेत.            राज्य आपत्ती दलाच्या समादेशक प्रियंका नारनवरे व सहाय्यक समादेश कृष्णा सोनटक्के यांच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या या प्रशिक्षणात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, राज्य आपत्ती दलाचे पोलीस निरिक्षक, ईश्वर रंधई, अमोल गोखले सहभागी असून जे.डी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश दुबळे, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू जयंत दुबळे व त्यांची चमु प्रशिक्षण देत आहे प्रशिक्षण शिबीरास मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणार्थी व स्थानिकांचा प्रतिसाद लाभत आहे.

 ‘आपदा मित्र’कार्यक्रमाविषयी…

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचा ‘आपदा मित्र’ कार्यक्रम राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. राज्य सरकारकडून याकरीता 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमातंर्गत नागपूर जिल्ह्यातील 14 तालुक्यामधून एकूण 500 स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील विविध विषयावर 12 दिवसाकरीता निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 500 स्वयंसेवकांची विभागणी 5 बॅचेस मध्ये करण्यात येणार व प्रत्येक बॅच मध्ये 100 स्वयंसेवकांचा समावेश करण्यात येणार आहे. यशस्वी 12 दिवस निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार, आपत्ती संरचना, आपदा मित्राची आपती व्यवस्थापना मध्ये भूमिका, शोध व बचावकार्य, प्रथमोपचार आणि समूदाय मुल्यांकन, सर्पदंश संरक्षण आदी माहिती देण्यात आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची आज मुलाखत

Thu Jan 19 , 2023
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि. 19 जानेवारी 2023 रोजी सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल. यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड नगपरिषदेचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला आहे. शहरातील दैनंदिन स्वच्छता, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights