कन्हान चे आठ कराटे खेडाळुनी नऊ पदक पटका वित राज्य स्पर्धेकरिता निवड.

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

दि.५ व ६ नोहेंबर ला औरंगाबाद येथे राज्य कराटे स्पर्धा. 

कन्हान : – कराटे डू असोशिएशन ऑफ नागपुर डिस्ट्रि क्ट (नागपुर जिल्हा कराटे कृती संघटना) व्दारे १३ वर्षा च्या लहान वयोगटातील जिल्हास्तरिय निवड कराटे स्पर्धा नागपुर विभागीय स्पोर्टस कॉन्प्लेक्स चे जाकिर खान यांच्या अध्यक्षेत संपन्न झाल्या, यात कन्हान च्या आठ कराटे खेडाळुनी सहभाग घेत नऊ पदक पटकावित सामोर होणा-या राज्य स्पर्धे करिता निवड होऊन त्यानी प्रवेश सुनिश्चित केला आहे.

कराटे डू असोशिएशन ऑफ नागपुर डिस्ट्रिक्ट (नागपुर जिल्हा कराटे कृती संघटना) व्दारे १३ वर्षा च्या लहान वयो गटातील जिल्हास्तरिय निवड कराटे स्पर्धेचे आयोजन नागपुर विभागीय स्पोर्टस कॉन्प्लेक्स चे जाकिर खान यांच्या अध्यक्षेत संपन्न झाल्या, यात कन्हान च्या आठ कराटे खेडाळुनी सहभाग घेतला असुन नऊ पदक पटकावित सामोर होणा-या राज्य स्पर्धेकरिता निवड होऊन त्यानी आपला प्रवेश सुनिश्चित केला आहे. या स्पर्धेत १) कु. माही शेंडे हिने १३ वर्ष, ४५ किलो वजन गटात फाइटिंग व काता यात क्रमशः प्रथम व द्वितीय स्थान प्राप्त केले. २) हर्षित रायपुरकर १२ वर्ष, ५० किलो वजन गटात फाइटिंग प्रथम स्थान व काता मध्ये द्वितीय स्थान प्राप्त केले. ३) मोइज खान ९ वर्ष, ३५ किलो वजन गटात द्वितीय स्थान प्राप्त केले.४) जोएल पॉल ने १० वर्ष, ४० वजन गटात प्रथम स्थान प्राप्त केले. ५) स्मिथ मस्के १२ वर्ष, ४५ किलो वजन गटात द्वितीय स्थान प्राप्त केले. ६) सोहन ओगारे ने १२ वर्ष ४५ किलो वजन गटात प्रथम स्थान प्राप्त केले. ७) आराध्या देवेंद्रसिंग सेंगर ८ वर्ष वयोगटात काता यात तृतीय स्थान प्राप्त केले आहे. सर्व आठ ही कराटे खेडाळु औरंगाबाद येथे दि.५ व ६ नोहेंबर ला होणा-या राज्य स्तरीय कराटे स्पर्धेत प्रवेश केला आहे.

कराटे एसोसिएशन ऑफ नागपुर डिस्ट्रिक्ट ही जिल्हा कृती कराटे समिती आहे. असुन कराटे दो एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र ला संलग्न आहे. आणि महाराष्ट्राची एकमेव भारतातील राष्ट्रीय कराटे संघ कराटे इंडिया ऑर्गेनाइजेशन शी संलग्न आहे. सर्व आठ ही विजयी कराटे खेडाळु हे शिहान दीपचंद शेंडे, रिदम शेंडे यांच्या तालिम मध्ये कराटे प्रशिक्षण घेत आहे. कन्हान परिसरातुन या विजयी कराटे खेडाळु वर अभिनंदनाचा वर्षाव करित आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com