नागपूर :- बीजेपीच्या मोदी सरकारमधील केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामण यांनी सन २०२५ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात समाजातील विविध घटकांना न्याय दिले नसून अर्थसंकल्पात भूलभूलैया आहे. बीजेपी सरकारने मजूर,व्यापारी,शेतकरी व महिला यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. महागाई कमी करतील याची उत्सुकता महिलांमध्ये होती पण निराशा झाली. बेरोजगार युवकांना रोजगार देण्याची योजनाच नाही.असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस ॲड. नंदा पराते यांचे मत आहे.
संसदमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात आदिवासी,ओबीसी ,दलित व अन्य मागासवर्गीयांना न्याय देणारी योजना नसल्याने निराशा झालेली आहे. युवकांना रोजगार देण्यासाठी , शेतकऱ्यांच्या शेतीमालास हमी भाव मिळण्यासाठी,कर्ज माफी केलेली नाही यामुळे युवा,महिला, शेतकरी व गरीबांची घोर फसवणूक झालेली आहे. मोदी सरकारने संसदमध्ये अर्थसंकल्प सादर केला, तो सामान्य नागरिकांसाठी निराशाजनक आहे अशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस ॲड. नंदा पराते यांनी टीका केली आहे.