राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी मेट्रो तर्फे ३० % सूट

*महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड*

(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)

नागपूर :- २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे राम मंदिराचे रीतसर उदघाटन मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या ह्स्ते होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार असून, राम जन्मभूमीचा सोहळा राज्यभरात साजरा करण्यासाठी राज्य सरकारकडून २२ तारखेला शासकिय सुट्टी घोषित केली आहे.

या निमित्ताने नागपूर मेट्रो तर्फे २२ जानेवारीला प्रवाश्यांकरता तिकिटावर ३० % सुट मिळणार आहे. शासकीय रजेच्या दिवशी नागपूर मेट्रो तर्फे ३० % सुट नेहमीच दिली जाते. तोच लाभ या २२ तारखेला (सोमवारी) अयोध्या येथील सोहळ्याच्या निमित्ताने नागपूरकरांना मिळणार असून, यामुळे शहरात आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याकरता नागरिकांना एका भागातून दुसऱ्या भागात प्रवास करणे अधिकच सोपे होणार आहे.

नागपूरकरांनी याचा फायदा घेत कार्यक्रमात सहभागी होण्याकरता नागपूर मेट्रोचा वापर करावा हे आवाहन नागपूर मेट्रो करीत आहे. मेट्रो सेवा ठरलेल्या वेळे प्रमाणे सकाळी ६ ते रात्रो १० पर्यंत नेहमीप्रमाणे उपलब्ध असेल.

NewsToday24x7

Next Post

अमृत काळात देशाच्या विकासासाठी युवकांची भूमिका मोलाची - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sat Jan 20 , 2024
नागपूर :- आपला देश हा आता अमृत काळातून जात आहे. २०२३ ते २०४७ यादरम्यानचा २०३५ पर्यंतचा काळ हा देशाची दिशा ठरविणारा असेल. २०३५ पर्यंत देशातील तरुणांची संख्या सर्वाधिक असेल. त्यामुळे अमृत काळात देशाच्या विकासात युवकांची भूमिका मोलाची राहणार असल्याचे प्रतिपादन नागपुरचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. Your browser does not support HTML5 video. रामदासपेठ येथील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com