बसपाने गोवारी शहिदांना अभिवादन केले

नागपूर :- राज्यात “गोंडगोवारी” नावाची जात नसून गोंड व गोवारी ह्या आदिवासी जातीतील वेगवेगळ्या जमाती असल्याने या दोन जमातीमध्ये एक कॉमा ( , ) देण्यात यावा ह्या प्रमुख मागणीसाठी 29 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील आदिवासी गोवारी समाजाने नागपूरच्या विधि मंडळावर एक मोर्चा काढला होता. परंतु सरकारने त्यांना न्याय देण्याऐवजी गोवारीं समाजाचे मुडदे पाडले त्या 114 गोवारी शहिदांना आज बसपा नेत्यांनी अभिवादन केले.

कही हम भूल न जाये या बसपाच्या अभियानांतर्गत आज बसपाचे नागपूर जिल्हा प्रभारी ऍड राहुल सोनटक्के, मा प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने यांच्या नेतृत्वात आदिवासी गोवारी शहीद स्मृतिस्थळाला पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी प्रामुख्याने माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकूवर, राजकुमार बोरकर, शहर प्रभारी विकास नारायणे, शहर उपाध्यक्ष उमेश मेश्राम, माजी शहर प्रभारी योगेश लांजेवार, मध्य नागपूर विधानसभाचे अध्यक्ष प्रवीण पाटील, दक्षिण नागपूर विधानसभेचे अध्यक्ष नितीन वंजारी, उत्तर नागपूर विधानसभेचे अध्यक्ष जगदीश गजभिये, पश्चिम नागपूर विधानसभा महासचिव अंकित थुल, उत्तर नागपूर विधानसभा महासचिव विवेक सांगोडे, आदिवासी समाजातील युवा नेते रोहित ईलपाची, शेषराव नेवारे, प्रकाश फुले, बुद्धम राऊत, सावलदास गजभिये, अरुण शेवडे, श्यामराव तिरपुडे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

29 वर्षापासून गोवारी समाजाला न्याय न मिळाल्याने आदिवासी गोवारी समाजाने 2024 च्या निवडणुकीत या प्रस्थापित सरकारला उलटवून टाकण्याचा निर्णय घ्यावा असे आवाहन याप्रसंगी बसपा नेत्यांनी केले.

स्मारकाच्या मुख्य प्रवेश द्वारावर इंग्रजी व मराठीत आदिवासी गोवारी शहीद स्मारक असे उलटे लिहिले आहे. इंग्रजीतील आदिवासीचा ए मागील अनेक महिन्यापासून गायब आहे. संबंधितांना सांगूनही ए लावण्याची तसदी घेतलेली नाही. याचा बसपा नेत्यांनी निषेध केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ आजपासून

Fri Nov 24 , 2023
– नगर परिषदा, ग्रामपंचायतींना भेट देत जाणार यात्रा भंडारा :- भारत सरकारच्या फ्लॅगशीप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचावेत यादृष्टीने केंद्र शासनाने राज्य / केंद्र शासित प्रदेशांचे सहकार्याने माहे एप्रील – मे , 2018 या कालावधित ग्राम स्वराज अभियान तसेच माहे जून – ऑगस्ट , 2018 या कालावधीत विस्तारीत ग्राम स्वराज अभियान राबविले आहे.अद्यापही या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com