नागपूर :- सुयोग हॉस्पिटल नरेंद्र नगर नागपूर च्यावतीने मध्य भारतात पहिल्यांदाच अंकल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया रविवारी ३० जून ला सकाळी ९ त १ या दरम्यान शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नागपूरातील सुप्रसिद्ध डॉ. गिरीश मोटवानी व त्यांची टीम सहीत साध्य करणार आहे.
छत्तीसगड येथील रहीवासी 40 वर्षीय या रुग्णावर हि शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी विशेषतः स्वित्झर्लंडमधून आयात केलेले इम्प्लांट मागवण्यात आले आहे. या शस्त्रक्रिया नंतर दुपारी २ नंतर सुप्रसिद्ध डॉ. गिरीश मोटवानी शस्त्रक्रिये बद्दल आपले व्यक्तिगत मत हे मीडिया समोर मांडतील. असे प्रसिद्धी पत्रात कळविले आहे.