अमरदिप बडगे , प्रतिनिधी
गोंदिया – जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथे महिला जनजागृती कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव यांनी जागर बाल हक्काचा कार्यक्रम साजरा केलेला तसेच मानव विकास योजना अंतर्गत शाळेतील इयत्ता 8 वी व 9 वी च्या विद्यार्थीना सायकल वाटप करण्यात आलेले आहे.
समग्रशीला अभियान अंतर्गत इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विध्यार्थी व विद्यार्थिनी ना गणवेश वाटप करण्यात आलेले आहे.
याप्रसंगी सदर कार्यक्रमा मध्ये योगेश पारधी, पोलीस निरीक्षक यांनी परिसरात घडणारे महिला संबंधिचे गुन्ह्यांची माहिती देऊन हे गुन्हे घडू नये म्हणून महिलांनी कोणती काळजी घ्यावी, महिला भयमुक्त वातावरणात सुरक्षित कसे राहतील,पोलिसांची मदत कशी मिळविता येईल, सायबर क्राईम, शासनाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत घर घर तिरंगा -हर घर तिरंगा या निमित्ताने ध्वज फडकविताना काय करावे व काय करू नये,तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, या बाबत सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे.
सदर कार्यक्रमाला जि. प. सदस्या तुमेश्वरी बघेले, पं. स. सदस्य तेजराम चव्हाण, ग्रामपंचायत सरपंच वडेगाव, डिलेश्वरी गौतम, पोलीस पाटील वडेगाव मुन्ना सोनवाने, पोलीस पाटील गांगला गायत्री लोहिया, राजकुमार पटले,राजु अनकर, प्राचार्य एस पी ठाकरे, भोजराम पटले, अंकुश राठोड, शाळेचे शिक्षक, शिक्षिका तसेच शाळेचे विध्यार्थी व विध्यार्थीनी प्रामुख्याने आवर्जून उपस्थित राहिले आहेत. कार्यक्रमाचे संचालन मेश्राम यांनी केलेले आहे.