नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील कॅरम स्पर्धेमध्ये बुधवारी (ता.24) झालेल्या दुस-या फेरीत राजू भैसारे, केवल मेश्राम यांच्यासह अन्य खेळाडूंनी आघाडी घेतली आहे.
उत्तर नागपूर क्रीडा संकुल अहुजा नगर येथे बुधवारी झालेल्या पुरूष एकेरीतील दुस-या फेरीमध्ये एजीआरसीच्या राजू भैसारेने पहिल्या दिवशी विजय संपादित केलेल्या सन्नी चंद्रीकापूरेला 22-4, 25-20 अशी दोन सेटमध्ये मात देत विजय मिळविला. प्रौढ गटातील दुस-या फेरीत एनकेएम च्या केवल मेश्रामने मकरंद बक्षीचा 23-9, 18-9 असा पराभव करीत विजय मिळविला. महिलांच्या सामन्यात एकेरीमध्ये पौर्णिमा पराळे ने पीजीव्ही च्या श्रेया मुदवालेला 25-0, 25-0 अशी एकतर्फी मात देउन विजय मिळविला. अन्य सामन्यामध्ये दिप्ती निशाद ने दविका मगदुमवार चा पराभव केला. जनताच्या पुष्पलता हेडाउ ने 21-0, 15-0 असा एकतर्फी पीजीव्हीच्या आर्या जैन पराभव करून स्पर्धेत आव्हान कायम ठेवले.
कॅरम
निकाल
पुरूष एकेरी (दुसरी फेरी)
राजू भैसारे (एजीआरसी) मात सन्नी चंद्रीकापूरे (एनएमसी) 22-4, 25-20
इशान साखरे (जनता) मात मंगेश राउत (व्हीबीएस) 25-5, 25-6
अनुराग रंगारी (गोंडवाना) मात नासीर खान (फ्रेन्ड्स) 12-25, 25-5, 25-0
प्रौढ गट (दुसरी फेरी)
केवल मेश्राम (एनकेएम) मात मकरंद बक्षी (खासदार) 23-9, 18-9
फिरोज खान (अकोला) मात भूपेंद्र केवती 16-8, 23-0
टेकचंद धुर्वे (जनता) मात अशोक कान्हे (अमरावती) 15-10, 14-6
महिला एकेरी
पौर्णिमा पराळे (राय) मात श्रेया मुदवाले (पीजीव्ही) 25-0, 25-0
दिप्ती निशाद (राय) मात दविका मगदुमवार (पीजीव्ही)
पुष्पलता हेडाउ (जनता) मात आर्या जैन (पीजीव्ही) 21-0, 15-0