नागपूर :- भाजपा आध्यात्मिक आघाडी नागपूर महानगर द्वारे भाजप शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्या नेतृत्वात श्री संत गुलाब बाबा जयंती उत्सवाचे औचित्याने पूर्व संध्येला आज श्री संत गुलाबबाबा आश्रम सिरस्पेठ येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच भव्य आरोग्य शिबिराचे आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना आध्यात्मिक संस्कार व्हावेत यासाठी डॉ श्रीरंग वराडपांडे यांनी श्री रामरक्षा,श्री गणपती स्तोत्र, मनाचे श्लोक आदीचे पुस्तके सुद्धा देण्यात आलीत. सर्वप्रथम श्री गुलाबबाबा यांचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले.
संस्थान चे अध्यक्ष चंद्रशेखर आदमने यांचे शुभहस्ते आश्रमातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले. याप्रसंगी सचिव अविनाश नाईक,आश्रमाचे राजू वड्याळकर, डॉ फरकासे,उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन आध्यात्मिक आघाडीचे संयोजक डॉ श्रीरंग वराडपांडे यांचे असून यशस्वीतेसाठी माया हाडे,मोहन महाजन, सुरेश गुप्ता, संजय लहाने,गुणवंत मेश्राम आणि आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संखेत उपस्थित होते.