अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय वर्ग 6 वी करिता परिक्षा घेण्यात आली होती.यामध्ये तिरोडा येथील लिटिल फ्लावर अकेडमीचे दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.यामध्ये तन्मय रघुनाथ शहारे,व शमुख उमेश बिसेन अशी विद्यार्थ्यांची नावे असुन त्यांच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक रोहित कुमार तिरपुडे सह शाळेचे इतर शिक्षक शिक्षिका , सुजाता डहाटे, राधाकृष्ण शेंडे, संजय कनोजे, मंगेश गेडाम, विजया पराते, अखिला शेख, यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांसह आई वडीलाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
विद्याथ्यानी आपल्याला यशाचे श्रेय प्रीती सामाजिक शिक्षण संस्थेचे सचिव प्रीती झरारिया व आई वडीलासह शिक्षकांना दिले आहे.