नागपूर :-बहुजन समाज पार्टीचे नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी डॉ आंबेडकर भवन दाभा येथे नागपूर मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय परिसरात असलेल्या अर्पण स्वेच्छा रक्तपेढी च्या माध्यमातून रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
त्यात संदीप मेश्राम यांनी स्वतः रक्तदान करून 19 रक्तदान दात्यांचे रक्तदान करण्यास मदत केली, त्यामुळे बसपा जिल्हाध्यक्षांचे अर्पण रक्तपेढि प्रमुखाने प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन केले.