संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कामठी तालुक्यात ईव्हीएम मशीन जनजागृती मोहीम
कामठी :- सन 2024 हे निवडणुकांचे वर्ष म्हणून गणले जाणार आहे.यावर्षी संपूर्ण देशात लोकसभा,विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत या अनुषंगाने निवडणूक आयोगाने कंबर कसली असून देशातील निवडणुका ह्या ईव्हीएम मशीन द्वारे घेतल्या जातात. या ईव्हीएम मशीन संदर्भात संभ्रम निर्माण होतो .या पाश्वरभूमीवर निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 58 कामठी विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी यांच्या आदेशानव्ये 10 डिसेंबर ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत कामठी तालुक्यात ईव्हीएम व विव्हीपॅट ची जनजगृती मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे.दरम्यान तालुक्यात ईव्हीएम व विव्हीपॅट मशीनचे प्रशिक्षण, प्रसार ,प्रसिद्धी करीत जनजागृती करण्यात येत आहे.
येत्या 2024 मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे.दरम्यान मतदारांमध्ये मतदान करताना कसलेही संभ्रम निर्माण न व्हावे या अनुषंगाने कामठी तालुक्यात ईव्हीएम व विव्हीपेट मशीन जनजगृती मोहीम राबविली जात आहे.यासाठी तालुकास्तरावर फिरते पथक तयार करण्यात आले आहेत.हे पथक शासकीय कार्यालय, शाळा,ग्रामपंचायत,सार्वजनिक ठिकाणी जाऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट कंट्रोल युनिट यांची ओळख मतदारांना करून देत आहेत.यामध्ये प्रत्यक्ष मतदार मतदान करून प्रक्रिया समजून घेत आहेत.
निवडणूक काळात मतदार ईव्हीएम संदर्भात जागरूक होण्यासाठी या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
राष्ट्रीय निवडणूक आयोग अंतर्गत कामठी तालुक्यात ईव्हीएम मशीन व विव्हीपॅड मशीन च्या माध्यमातुन कामठी तालुक्यात ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे व आपण ज्या उमेदवाराला मतदान केले असता त्या व्यक्तीला ते मतदान झाले की नाही याबाबद ची खात्री व मतदाना बद्दल जनजागृती तहसिलदार अक्षय पोयाम,नायब तहसीलदार उपेश अंबादे,नायब तहसिलदार राजीव बमनोटे,मंडळ अधिकारी संजय कांबळे करीत आहेत.