बसपा ने आरक्षण दिन साजरा केला

नागपूर :- तत्कालीन कोल्हापूर (करवीर) संस्थानचे राजे राजर्षी छत्रपती शाहू ह्यांनी 26 जुलै 1902 रोजी आपल्या संस्थानात मागास वर्गीयांना 50 टक्के आरक्षणाची घोषणा करून अंमल बजावणीही केली होती. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या आरक्षणाला संविधानिक मान्यता दिली. आज त्याला 122 वर्षे पूर्ण झालीत.

त्या घटनेची आठवण म्हणून बसपा ने कही हम भूल न जाये या राष्ट्रीय अभियानांतर्गत आज संविधान चौकात छत्रपती शाहू व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार, माजी जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, महिला नेत्या सुनंदा नितनवरे, तारा गौरखेडे यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.

संविधान लागू होऊन 75 वर्षे झालीत, परंतु संविधानाला न मानणाऱ्या लोकांच्या केंद्रात व राज्यात सत्ता असल्याने खऱ्या अर्थाने संविधानावर अंमल होऊ शकला नाही. म्हणून भारतीय संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी फुले, शाहू, आंबेडकरी विचारांच्या बहुजन समाजावर व त्यांच्या पक्षावर असल्याचे मत बसपा नेत्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. असे झाले तरच सर्व सामान्यांना त्या आरक्षणाचा फायदा पोहोचेल असेही बसपा नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

बसपाने 26 जुलै या आरक्षण दिनापासून 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनापर्यंत राज्यभर संविधान रक्षण व आरक्षण समारोहाचे आयोजन केलेले आहे. त्या अभियानाची आज नागपुरातून सुरुवात करण्यात आली अशी माहिती बसपाचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी याप्रसंगी दिली.

याप्रसंगी प्रामुख्याने भदंत डॉ धम्मोदय, युवा नेते चंद्रशेखर कांबळे, सदानंद जामगडे, प्रा सुनील कोचे, जगदीश गजभिये, गौतम पाटील, विकास नारायणे, सावलदास गजभिये, संभाजी लोखंडे, अनिल मेश्राम, सुनील बारमाटे, अरुण शेवडे, विनय पाटील, चंदू बोरकर, अजय उके, शंकर थूल, जितेंद्र पाटील, विलास मून, राजेंद्र सुखदेवे, उमेश मेश्राम, यशवंत निकोसे, प्रवीण पाटील, प्रकाश सोनटक्के, पी बी कराळे, राजकुमार बोरकर, शत्रुघ्न धनविजय, स्वप्नील ढवळे, अंकित थूल, कल्पना बनकर, वैशाली वानखेडे, प्रभा फुकटकर, रेखा तायडे, उषा हाडके, वर्षा ढोके, इंदू धुर्वे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कार्यवाहीला गती, आतापर्यंत बुजविले ९६८ खड्डे

Sat Jul 27 , 2024
नागपूर :- पावसामुळे नागपूर शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याच्या कार्यवाहीला गती देण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार हॉट मिक्स प्लाँट विभागाद्वारे खड्डे बुजविण्याच्या कामाला गती आलेली आहे. मागच्या दहा दिवसात मनपाच्या दहाही झोनमध्ये यंत्रेणेने ९६८ खड्डे (५६०२ चौ.मी.) बजुविले आहे. या कामात इंस्टा व जेट पॅचरचा सुध्दा वापर करण्यात आला आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com